Wari 2019 : निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

"संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज की जय', "ग्यानबा तुकाराम'सह विठुनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात मंगळवारी (ता. 18) सकाळी साडेदहाच्या सुमारास संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याने नाशिककडे प्रस्थान ठेवले. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दिंडीतून पर्यावरणाचा जागर करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. प्लॅस्टिकमुक्तीबरोबरच दिंडीच्या मुक्कामी वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले आहे.

नाशिक - "संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज की जय', "ग्यानबा तुकाराम'सह विठुनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात मंगळवारी (ता. 18) सकाळी साडेदहाच्या सुमारास संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याने नाशिककडे प्रस्थान ठेवले. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दिंडीतून पर्यावरणाचा जागर करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. प्लॅस्टिकमुक्तीबरोबरच दिंडीच्या मुक्कामी वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले आहे.

त्र्यंबकच्या कुशावर्त तीर्थावर स्नान, आरती झाल्यावर पालखीने बाहेरूनच त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. दिंडी सोहळ्यात एकूण 47 दिंड्या सहभागी झाल्या असून, नगरपासून यात आणखी वाढ होऊन ती शंभराच्या पुढे जाईल, असे काही दिंडीप्रमुखांनी सांगितले. सातपूरच्या मुक्कामात दिवंगत वारकऱ्यांच्या नातलगांपासून या वृक्षारोपणास सुरवात होईल. त्यानंतर माउलींच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी प्रत्येकी दिंडीने किमान पाच झाडे लावण्याचे नियोजन असून, पुढील काळात माउलींचा दिंडीप्रवास सावलीतूनच व्हावा, असे नियोजन असल्याचे निवृत्तिनाथ देवस्थानचे माजी अध्यक्ष संजय महाराज धोंगडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 nivruttinath maharaj Palkhi Sohala