
शिरपूरजवळ दीड लाखांचा मद्यसाठा जप्त
शिरपूर (धुळे) : शिरपूरकडून शिंदखेड्याकडे मद्याची अवैध वाहतूक करणारी कार शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने जप्त केली. ही कारवाई शनिवारी (ता.२८) सायंकाळी शिरपूर-बोरगाव रस्त्यावर रुमित केमिसिंथ फॅक्टरीसमोर घडली. नंदुरबार येथील संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाघाडीमार्गे शिंदखेड्याकडे एका चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली होती. पोलिसांच्या गस्ती पथकाने वाघाडी -बोरगाव रस्त्यावरील रुमित केमिसिंथलगत सापळा रचला. सायंकाळी बोरगावच्या दिशेने निघालेल्या कार (एमएच २१ व्ही १२९७) ला संशयावरून थांबवले असता चालक जितेंद्र पूनमचंद सोनानिस (वय ४३, रा. हुडको कॉलनी, नंदुरबार) याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कारची झडती घेतल्यानंतर ४० खोक्यात भरलेल्या देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. मद्यसाठ्यासह कारची एकूण किंमत दोन लाख ६५ हजार २०० रुपये आहे. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कुटे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा: गावठी दारू हातभट्टीवर छापा; सव्वा लाखाची दारू जागेवरच नष्ट
हेही वाचा: 'सकाळ' इम्पॅक्ट : महामार्गाला पडलेले तडे भरण्याचे काम सुरु
Web Title: 1 Lakh Rs Liquor Seized Near Shirpur Dhule News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..