जळगाव- ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमामुळे शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला असून, अनेक जिल्हा परिषद शाळा ‘आधुनिक शिक्षण केंद्र’ बनत आहेत. जळगाव ग्रामीणमधील पटसंख्या वाढविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना १० लाखांचा आमदार निधी देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.