शहाद्यात १०, ११ ला होणार प्लेसमेंट सेल!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

लोणखेडा : शहादा येथील पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल समितीकडून १० व ११ फेब्रुवारीला प्लेसमेंट सेल भरविण्यात येणार आहे. यात नामांकित बँका व कंपन्या सहभागी होणार आहेत.

प्लेसमेंट सेलमध्ये आयसीआयसीआय, ॲक्सीस, महिन्द्रा कोटक व एचडीएफसी बँका येणार आहेत. गुजरात अंबुजा, भारत फर्टीलायझर्स, सॅफन टेक्नोहब प्रा. लि. व फार्मास्युटिकल कंपन्या मुलाखती घेण्यास येणार आहेत. विविध बँका व कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी ‘कॅम्पस रिक्रुटमेंट’ होणार आहे. माजी विद्यार्थी तसेच पदवीच्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पटेल, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे संयोजक डॉ. आय. जे. पाटील यांनी केले आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10th, 11th Feb Placement Cell in Shahada

Tags
टॉपिकस
Topic Tags: