Dhule News: 128 कोटी उत्पन्नात ‘थकबाकी’च भारी! मालमत्ता कर, पाणीपट्टीतून मिळणारे अपेक्षित उत्पन्न

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : महापालिकेचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी धुळे महापालिकेला या वर्षी तब्बल १२८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा हा आकडा सुखावणारा असला तरी चालू मागणी अर्थात दर वर्षी मिळू शकणारे उत्पन्न ३६.६९ कोटी रुपये आहे.

अर्थात सध्या दिसत असलेल्या १२८ कोटी रुपयांच्या उत्पन्नात थकबाकीचे प्रमाण तब्बल ९१ कोटी रुपये आहे. वर्षाकाठी यातून काही कोटी रुपये वसुली होते. उर्वरित आकडा पुन्हा थकबाकीत जातो. त्यामुळे महापालिकेपुढे खरी समस्या थकबाकी वसुलीचीच आहे. (128 crores in income dues heavy Expected income from property tax water lease Dhule News)

विशेषतः ड वर्ग महापालिकांचा प्रमुख आर्थिक स्रोत मालमत्ता कर, पाणीपट्टी यावरच अवलंबून आहे. इतर विविध कामे केंद्र, राज्य शासनाच्या योजनांमधून होतात. अर्थात यात महापालिकेलाही थोडाफार हिस्सा भरावा लागत असला तरी शहर विकासाची मोठी भिस्त केंद्र, राज्य सरकारांवर आहे.

धुळे महापालिकेला मालमत्ता कर, पाणीपट्टीव्यतिरिक्त इतर आर्थिक स्रोत निर्माण करता आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पदाधिकारी, नगरसेवकांकडून अनेक उपाय सुचविले जातात. पण, ते केवळ बोलण्यापुरते ठरतात.

प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी ना प्रशासन पुढाकार घेते ना उपाय सुचविणारे पदाधिकारी, नगरसेवक यासाठी पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे आजही सर्व भिस्त मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीवर आहे.

या एकमेव प्रमुख आर्थिक स्रोताचीदेखील मोठी शोकांतिका आहे. दर वर्षी चालू मागणी केवळ ३६-३७ कोटी रुपये आहे. त्यामुळे मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या रूपाने महापालिकेचा प्रमुख आर्थिक स्रोतदेखील तुलनेने तुटपुंजा ठरतो.

९१ कोटी रुपये थकबाकी

मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकीचा प्रश्‍न मोठा गंभीर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही स्थिती कायम आहे. नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल झाल्याचे सांगितले गेले. त्यातून एकूण वसुलीची टक्केवारीही मोठी दाखविली गेली.

प्रत्यक्षात त्यातही घोळ झाल्याचे नंतर समोर आले. अर्थात वसुलीच्या टक्केवारीवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिल्याचेही पाहायला मिळाले आहे. या वर्षीदेखील मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी महापालिकेला अपेक्षित असलेल्या उत्पन्नाचा आकडा तब्बल १२८ कोटी रुपये दिसतो.

शंभर कोटींवर असलेले उत्पन्नाचे हे उड्डाणही थकबाकीच्या भरवशावर आहे. अर्थात या १२८ कोटी रुपये उत्पन्नात तब्बल ९१ कोटी रुपये थकबाकीच आहे. यात मालमत्ता कर थकबाकी तब्बल ५९ कोटी रुपये आहे तर पाणीपट्टीची थकबाकीदेखील ३२ कोटींवर आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Amrit Bharat Scheme: मनमाड, नगरसूल रेल्वेस्थानकात ई-भूमिपूजन! रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी मिळणार निधी

भर थकबाकीवरच हवा

दर वर्षी मार्चएन्ड जवळ आली की मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा जुंपली जाते. अर्थात वर्षभर अधूनमधून कारवाई सुरू असते. यंदा आजघडीलाही थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उचलल्याचे पाहायला मिळत आहे.

आजघडीला विशेषतः कागदोपत्री झोपडपट्टी (स्लम) असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे अधिकारी म्हणतात. दर वर्षी शंभर टक्के शास्ती माफी देऊनही ही थकबाकी वसूल होत नाही.

त्यामुळे या प्रश्‍नावर महापालिकेने ठोस तोडगा काढण्याची गरज आहे. तरच हा थकबाकीचा आकडा कमी होण्यास मदत होणार आहे.

मालमत्ता अपेक्षित उत्पन्न असे

-निवासी मालमत्ता.......६८,४७२

-वाणिज्य मालमत्ता........८,८७९

-एकूण मालमत्ता.........७७,३५१

अपेक्षित उत्पन्न

-थकबाकी...........५९.०९ कोटी

-चालू................२६.१३ कोटी

-एकूण...............८२.२२ कोटी

पाणीपट्टीची स्थिती अशी

-नळधारक.........५ कोटी आठ हजार ७३

अपेक्षित उत्पन्न

-थकबाकी...........३२.४१ कोटी

-चालू................१०.५६ कोटी

-एकूण...............४२.९७ कोटी

-नळ नसलेल्या मालमत्ता...२९७३१

-अपेक्षित उत्पन्न........६.४३ कोटी

Dhule Municipal Corporation
PSI Success Story: कष्टाचे चीझ करत चषकावर मोहर! पोलिस दीक्षांत संचलनात उमराणेच्या ‘किरण’ला 3 पुरस्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com