१३७ गावांचा भार 'एवढ्याच' कृषीसहाय्यकांवर... 

दीपक कच्छवा :  सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जळगाव : चाळीसगाव तालुका कृषी विभागात विविध पदे रिक्त असल्याने कृषीविभागाच्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. कृषीविभागात ३३ विविध पदे रिक्त असल्याने शेतकरी योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळत नसल्याने कृर्षीविभागातील मंडळ कृषीधिकारी यांच्या पदासह इतर रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत अशी मागणी होत आहे. तालुका कृषीविभागात महत्वाचे मंडळातील चार कृषीअधिकारी यांचे पदच रिक्त असल्याने येथे शेतक-यांसह येथील कार्यालयीन कर्मचार्यांना काम करतांना खूपच आडचणी येत आहेत. 

जळगाव : ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर चाळीसगाव तालुक्यातील कृषी विभागात कर्मचाऱ्यांचा वनवा असून तालुक्यात जवळपास ३३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कृषी कर्मचा-यांची मोठी धावपळ उडत आहे. तालुक्यात चार कृर्षी मंडळ अधिकारी  मंडळात सर्वाधिक १२ कृषी सहाय्यकांची पदे रिक्त असुन तब्बल १३७ गावांचा भार अवघ्या ३७ कृषीसहाय्यक सांभाळत आहे.

तालुका कृषी विभागात विविध पदे रिक्त असल्याने कृषीविभागाच्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. कृषीविभागात ३३ विविध पदे रिक्त असल्याने शेतकरी योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळत नसल्याने कृर्षीविभागातील मंडळ कृषीधिकारी यांच्या पदासह इतर रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत अशी मागणी होत आहे. तालुका कृषीविभागात महत्वाचे मंडळातील चार कृषीअधिकारी यांचे पदच रिक्त असल्याने येथे शेतक-यांसह येथील कार्यालयीन कर्मचार्यांना काम करतांना खूपच आडचणी येत आहेत. 

योजनांपासून शेतकरी वंचित, कृषीविभागात मनुष्यबळ कमी 
कृर्षी विभागात सध्या स्थितीत ३७ कृषीसहाय्यक असून यातील तीन जण नाशिकला प्रतिनियुक्तीवर आहेत. यातील दोन महिला दीर्घकालीन रजेवर आहेत. यामुळे सध्या ३३ कर्मचाऱ्यांना १३७ गावांचा भार आहे. शेतक-यांना योजनांची माहिती त्यांच्यापर्यत पोहचत नसल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याचे एकुण ९१ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात यावर्षी पन्नास टक्के कपाशी लागवड झाली आहे. मागच्या वर्षी बोंड आळीच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी अजूनही बोंडआळी येते की काय या भीतीत जगत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजना आजही शेतक-यांच्या बांधावर पोहचवण्यासाठी तालुका कृषीविभागात मनुष्यबळ कमी आहे. तालुक्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी स्वत लक्ष घालुन तालुक्यातील कृर्षी विभागात रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करावा आशी मागणी होत आहे.

पोखरा योजनेचे काम रखडले 

पोखरा योजनेची सर्वाधिक गावे चाळीसगाव तालुक्यात आहेत. यामध्ये दहीवद, कुंझर, करमुड, उंबरखेडे, पिलखोड, मादुर्णे, पाटणा, लोंजे, सोनंगाव, पिंपरखेड, नाव्हे, डामरुण, बोरखेड्यासह इतर गावात सध्या पोखरा योजनेची कामे रखडली आहेत. विविध पदासोबत कृषी अधिकारी कृर्षीसाहाय्यक, कृर्षीपर्यवेषक, सुपरवायझर असे विविध एकूण ८४ पदे आहेत. यामध्ये ५२ पदे भरली असून यात ३३ पदे रिक्त आहेत. त्यामुळेआहे त्या कर्मचाऱ्यांना कामाचा ताण वाढल्याचे दिसून येत आहे. पोखरा योजनेची रखडलेली कामे लवकर पूर्ण करावी अशी मागणी होत आहे. 

तालुका कृषीविभागात रिक्त असलेली पदे

कृषीधिकारी - ४, कृषीसहाय्यक-१२, कृषीपर्यवेक्षक-३, क्लर्क-४, अनुरेखक - ६ , शिपाई, पहारेकरी-४


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 137 villages depends on less agriculture assistants in chalisgaon