धक्कादायक...भडगावात आढळले 15 "कोरोना'बाधित; जिल्ह्याची रुग्णसंख्या 278 वर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

जिल्ह्यात 278 "पॉझिटिव्ह' 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्ताची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सकाळपासून जिल्ह्यातील विविध तालुक्‍यातील 246 संशयित रुग्णांचे अहवाल आज प्राप्त झाले आहे. यातील 21 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या ही 278 वर पोहोचली आहे. मृताची संख्या 33 तर 59 जण बरे होऊन घरी गेले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये भडगावातील 15, चोपड्यातील 4, जळगाव येथील सुप्रिम कॉलनीतील 48 वर्षीय पुरूष व पाचोरा तालुक्‍यातील एकाचा समावेश आहे. 

भडगाव : तालुक्‍यातील 99 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यात 15 जण "पॉझिटिव्ह' आढळून आले. तर 83 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' आढळले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांनी दिली. 
शहरातील आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये दत्तमढी गल्ली, वाचनालय गल्ली या भागातील काही रुग्णांचा समावेश आहे. तर उज्ज्वल कॉलनीतील एका भाजी विक्रेत्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्‍यातील एकूण संख्या बाधितांची संख्या 23 झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. पालिकेने ज्या भागात रुग्ण सापडले, त्या भागात रात्रीतून फवारणी सुरू केली. तर त्या त्या भागाला "सील' करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

जिल्ह्यात 278 "पॉझिटिव्ह' 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्ताची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सकाळपासून जिल्ह्यातील विविध तालुक्‍यातील 246 संशयित रुग्णांचे अहवाल आज प्राप्त झाले आहे. यातील 21 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या ही 278 वर पोहोचली आहे. मृताची संख्या 33 तर 59 जण बरे होऊन घरी गेले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये भडगावातील 15, चोपड्यातील 4, जळगाव येथील सुप्रिम कॉलनीतील 48 वर्षीय पुरूष व पाचोरा तालुक्‍यातील एकाचा समावेश आहे. 

भडगावात सर्वाधिक "पॉझिटिव्ह' 
पाचोरा तालुक्‍यात केवळ दहा दिवसातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पन्नाशीपार पोहचला आहे. त्यामुळे जळगाव, अमळनेर व पाचोरा तालुका हॉटस्पॉट बनला आहे. पाचोऱ्यापासून भडगाव तालुका काही अंतरावर आहे. याठिकाणी आज तब्बल 15 जण पॉझिटिव्ह आढळून आले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 "corona'infected found in Bhadgaon

टॅग्स
टॉपिकस