दे...दारू ऽ..ऽऽ दे दारू ! जळगावात.मद्याचे पाट ; 3 दिवसातच रिचवले 2 लाख साडेसात हजार लिटर मद्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

ब्रॅण्डेड दारूच मिळत नसल्याने तळीरामांची पंचाईत झाली होती, शासनाने 45 दिवसानंतर राज्यातील सर्वच वाईनशॉप फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करून उघडे करण्याचे आदेश दिले. मात्र, दारू खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली, पोलिसांना लाठीचार्ज करून गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले. 46 दिवसानंतर ओरिजनल ब्रॅण्डेड दारू पेरण्यासाठी मिळत असल्याने लोकांनी किराणाच्या थैल्या घेत 43 अंश सेल्सिअस मध्ये तासन्‌तास रांगेत उभे राहून दारूचा साठा करून घेतला. 

बंदच्या चर्चेने पुन्हा दारुड्यांची गर्दी 
जळगाव,ता. 9 :- कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. जीवनावश्‍यक वस्तू वगळता हॉटेल बिअरबार आणि वाईनशॉपही बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने गेली 46 दिवस जळगाव जिल्ह्यातील दारू विक्री बंद होती. राज्य शासनाच्या महसुलातील तूट भरून काढण्यासाठी फिजिकल डिस्टन्सींग पाळून दारू विक्रीला शासनाने परवानगी दिल्याने मद्यप्रेमींच्या आनंदाला पारावार उरला नाही. 6 ते 8 या तीनच दिवसात दारुड्यांनी तब्बल 2 लाख साडेसात हजार लिटर दारू एकट्या जळगाव जिल्ह्यात रिचवली असून लाखो रुपयांचा महसूल यातून प्राप्त झाला आहे. 

लॉकडाऊनच्या कालखंडात मार्च (ता.22) नंतर जिल्ह्यातील सर्वच आस्थापना बंद करण्यात आल्या. हॉटेल्स बियर बार आणि वाईन शॉप बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर तळीरामांची पुरती पंचाईत झाली. लॉकडाऊन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिलबंद केलेल्या वाईनशॉप उघडून त्यातून दारूची सर्रास तस्करी करण्यात येत होती. अजिंठा चौकातील आर.के.वाईन, आणि नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स अशा दोन ठिकाणावर गुन्हेशाखेने छापेमारी केल्यानंतर दोघांचे परवाने रद्द करण्यात येऊन पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांना खात्यातून बडतर्फ करण्यात आले. तक्रारीवाढल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील व जिल्ह्यात इतर संशयित वाईन शॉपचा स्टॉक मोजणी केल्यानंतर काही ठिकाणी तफावती आढळून आल्या. परिणामी चोरीने ब्लॅक मध्ये दारू विकरणाऱ्या वाईनशॉप चालकांचे धाबे दणाणले आणि दारूची विक्रीच पुर्णंत: बंद करण्यात आली होती. काही दिवस ब्लॅक मध्ये सव्वा शे रुपयांची क्वार्टर सहाशे रुपयांपर्यंत घेऊन तळीरामांनी आत्मागार केला मात्र, खिशाला झळ सोसावी लागली. ब्लॅक मार्केट मधील मर्यादित दारूसाठीही संपुष्टात आल्यानंतर, हातभट्टी आणि मोहाच्या दारूकडे तळीरामांनी धाव घेतली. वाढती मागणी पाहता मध्यप्रदेशातील "गोवा रम' आणि "बॉम्बे विस्की' या लोकल ब्रॅण्डची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात आल्याने पोलिस प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागला. 

46 दिवसांचा उपवास 
ब्रॅण्डेड दारूच मिळत नसल्याने तळीरामांची पंचाईत झाली होती, शासनाने 45 दिवसानंतर राज्यातील सर्वच वाईनशॉप फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करून उघडे करण्याचे आदेश दिले. मात्र, दारू खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली, पोलिसांना लाठीचार्ज करून गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले. 46 दिवसानंतर ओरिजनल ब्रॅण्डेड दारू पेरण्यासाठी मिळत असल्याने लोकांनी किराणाच्या थैल्या घेत 43 अंश सेल्सिअस मध्ये तासन्‌तास रांगेत उभे राहून दारूचा साठा करून घेतला. 

 

पुन्हा बंदचे वारे.. 
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या शनिवारी सकाळी (ता.9) 157 पोचल्याने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी रविवार पासून अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश पारित केल्याने गेल्या तीन दिवस वाईनशॉपवर लागलेल्या रांगा आज कमी झाल्या असतानाच अचानक संध्याकाळी पुन्हा रांगा लागल्या होत्या. वाईन शॉप बंद करण्या संदर्भात अद्याप तरी अध्यादेश प्राप्त झाला नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले. 
-------------- 
अशी दारू विक्री लिटर मध्ये 
 बुधवार ता. 6 ,    गुरुवार ता.7 , शुक्रवार ता.8 
-देशी :- 35048         34285           38718 
-विदेशी :-17042       15801           14591 
-बिअर :- 17297       17871            17004 
- एकूण :-108051      47434             52172 
- एकत्रित विक्री :-2 लाख 7 हजार 657 लिटर मध्ये
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 lakh litar alccohol sale out in 3days in jalgaon