Dhule News : धुळ्यात 2 टॉवर सील! महापालिकेच्या जप्ती पथकाची धडक कारवाई

Municipality team while sealing the mobile tower in the city.
Municipality team while sealing the mobile tower in the city.esakal

धुळे : मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात महापालिकेतर्फे कारवाईची मोहीम सुरूच आहे. बारापत्थर चौकातील दुकानासह मुंबई-आग्रा महामार्गावरील मोहाडीतील उड्डाणपुलानजीक मोबाईल टॉवरला बुधवारी (ता. १) सील ठोकले. (2 towers sealed in Dhule Strike action of Municipal Corporation dhule confiscation team Dhule News)

बारापत्थर येथे अब्दुल रहेमान महोम्मद वजीर यांचे घरवजा फ्रेंड्स रेफ्रिजरेटर नामक दुकान आहे. त्यांच्याकडे एक लाख २५५ रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी भरण्याबाबत त्यांना चार ते पाच वेळा नोटीस बजावण्यात आली.

मात्र, त्यांनी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या जप्ती पथकाने दुकानासह घराला सील केले. तसेच मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ मोहाडी रस्त्यावरील चंद्रकांत पाटील यांच्या मालकीच्या शिंदे कॉम्पलेक्सवर एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. त्याची सुमारे आठ लाख ७० हजार ४३० रुपये थकबाकी आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Municipality team while sealing the mobile tower in the city.
Dhule Crime News : बनावट मद्य कारखान्यावर छापा; चौघांवर गुन्हा दाखल

त्यांनाही वेळोवेळी नोटिसा दिल्या. मात्र, टॉवरचालकाने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने मोबाईल टॉवर सील केला. शहरात आतापर्यंत आठ मोबाईल टॉवरवर कारवाई झाली आहे.

ही कारवाई आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाचे अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर वडनेरे, अजय देवरे, मनोज चिलंदे, भरत पारखे, रवींद्र पाटील, अशोक मंगीडकर यांनी केली.

Municipality team while sealing the mobile tower in the city.
Police Transfer : अंबडच्या सहायक निरीक्षकाची तडकाफडकी बदली! अपर महासंचालकांची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com