शिक्षणासाठी काय पण...... 

दिपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण घेण्यासाठी अंबासन येथील नागरिक व विद्यार्थ्यांना शिरवाळ नाल्यातील पाण्यातून मार्ग काढत जीवघेणी पायपीट करावी लागत आहे. या ठिकाणी लोखंडी पुलाची निर्मिती करावी अशी मागणी होत आहे.

५० ते ६० शेतकरी व विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास बंद

शाळेत जाण्यासाठी तसेच इतर कामासाठी अंबासन गावातून शिरवाळा नाल्यावरून शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाच्या पाण्यामुळे परिसरातील पाणी या नाल्यात येऊन हा नाला पूर्णपणे बंद झालेला आहे. यामुळे परिसरातील ५० ते ६० शेतकरी व विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास बंद झाला आहे. तसेच शेतकरी व विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी लवकरात लवकर पुलाची निर्मिती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा