नाशिक जिल्ह्यातील २३७३ विद्यार्थ्याचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना रामराम

नाशिक जिल्ह्यातील २३७३ विद्यार्थ्याचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना रामराम

खामखेडा (नाशिक) - पडक्या भिंती, गळकी छपर अशी ओळख पुसताना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड अशा तंत्रज्ञानाने युक्त डिजिटल क्लासरूम, रंग रंगोटीने आकर्षक इमारती, शिक्षकाची अध्यापनातील नाविन्यपूर्णता, शिक्षकांच्या धडपडीतून वाढलेली शाळेची गुणवत्ता आणि लोकप्रियता यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व विध्यार्थ्यानी डोक्यावर घेतले आहे. याच बदलामुळे नाशिक जिल्ह्यातील २३७३ विद्यार्थ्यानी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना रामराम करत विविध जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला आहे.

२२ जुन २०१६ च्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रा उपक्रमाअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा लोक सहभागातून चेहरामोहरा बदललेला आहे. अध्यापनातील तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करत वाड्या वस्त्या वरील डिजिटल शाळा उपक्रमाने शाळांचा व शिक्षकांचा अध्यापनाचा दर्जा उंचावल्याने ग्रामीण भागातील पालकांचा दृष्टिकोन बदलल्याने इंग्रजी माध्यमातील शाळामधून पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळांमध्ये घातल्याचे विधायक चित्र पहायला मिळाले. ज्ञानरचनावादाचा उपयोग, डिजिटल शाळा, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, सेमी इंग्रजी वर्ग, आयएसओ मानांकन ,शाळा सिद्धी, गुणवत्ता विकास उपक्रमामुळे इंगर्जी माध्यमातील विध्यार्थ्यांन पेक्षा दर्जेदार शिक्षण मिळू लागल्याने पालकांचा कल मराठी शाळांकडे वाढला आहे.

शिक्षकांनी अध्यापनात नाविन्यता आणत तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करत मराठी शाळांना राज्यभरात वेगळी ओळख मिळवून दिल्याने मराठी शाळांकडे पालकांचा कल वाढू लागला  आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळद, माळीनगर, भोयेगाव, फांगदर, राजदेरवाडी, नारायणगाव, बोरस्तेवस्ती, पाटविहीर, कोलदर, या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विध्यार्थी कुशलतेने तंत्रज्ञान हाताळत असल्याने राज्यभरात ह्या शाळांचा लौकिक वाढला आहे. या शाळांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक पटलावर वेगळी ओळख निर्माण करून इतरांनाही प्रेरणा दिली आहे.चांदवड सारख्या ग्रामीण भागातील भोयेगाव हि शाळा इंटरनॅशनल झाली असून ह्या शाळेत या वर्षी ११४ विध्यार्थ्यानी इंग्रजी माध्यमाला बाय बाय करत प्रवेश घेतला आहे. मराठी शाळांच्या बाबतीत हि भूषणावह बाब आहे.

ग्रामीण भागात आता प्राथमिक शिक्षणाबाबत वेगळे विचार केले जाऊ लागले आहेत. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने व आई वडिलांकडून मुलांना इंग्रजी भाषेत शिकवण्यात येणाऱ्या अडचणी ग्रामीण भागात शिकवण्याची कमतरता या कारणांनी देखील शाळांची संख्या मराठी शाळांकडे वाढली आहे.

तालुकानिहाय इंग्रजी माध्यमातून जि. प. शाळेत दाखल विद्यार्थी संख्या
बागलान-१२८, देवळा-७९, कळवण-१७३, त्रंबकेश्वर-७५, येवला-४३, इगतपुरी-१०, पेठ १४, चांदवड-६२०, निफाड-५४८, सिन्नर-३२४, नांदगाव-६४, सुरगाणा-१९, मालेगाव-१९२, दिंडोरी-८, नाशिक-७६

मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विविध नवोपक्रम राबविले जात आहे. शिक्षकांमुळे जिल्ह्यातील ७५टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. अनेक शाळांमध्ये एलईडी, एलसीडी, संगणक, टॅब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शिवाय अध्यापनाच्या नवनवीन पद्धतीही विकसित केल्या जात आहेत. यामुळे खासगी शाळांतील विद्यार्थी जि.प. शाळांकडे आकर्षित होत असून पटसंख्येत सुधारणा झाली आहे.
डॉ वैशाली झनकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी नाशिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com