Dhule News : धारबर्डीपाड्यावर आगीत 32 क्विंटल कापूस खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shildar Pavara's house burnt down.

Dhule News : धारबर्डीपाड्यावर आगीत 32 क्विंटल कापूस खाक

शिरपूर (जि. धुळे) : सांगवी (ता. शिरपूर) येथील धारबर्डीपाड्यावर कुडाच्या घराला आग लागून सुमारे ३२ क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना बुधवारी (ता. २५) सकाळी दहाला घडली.(32 quintals of cotton got burnt after fire broke out at Kuda's house at dharbardipada dhule news)

शिलदार गुलाब पावरा यांच्या मालकीचे हे घर असून, नेहमीच्या वापराच्या खोल्यांमध्ये त्यांनी कापूस भरला होता. सकाळी घराला आग लागली. कुडाचे घर असल्याने व वारा वाहत असल्यामुळे आगीने लगेचच वेग पकडला.

कापूस कोरडा असल्याने काही वेळातच खाक झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र अवघ्या अर्ध्या तासात लाकडी वासे, कुडासह सर्व साहित्याची राखरांगोळी झाली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

आगीचे कारण समजू शकले नाही. या दुर्घटनेमुळे पावरा कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहे. त्यांचा मुलगा भायला पावरा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेला धावपटू आहे. या कुटुंबाला तातडीने भरीव शासकीय मदत करावी, अशी मागणी परिसरातील लोकप्रतिनिधींमधून करण्यात आली.