Dhule : जिल्ह्यातील प्रकल्पात 35 टक्के साठा

Water level at Dam reference image
Water level at Dam reference imageesakal

सोनगीर (जि. धुळे) : गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही भागात बऱ्यापैकी पाऊस (Rain) झाल्याने धुळे जिल्ह्यातील प्रकल्पात ३५.८६ टक्के जलसाठा असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत १३.२५ टक्के वाढ झाली आहे. (35 per cent stock in dhule project in district latest marathi news)

गेल्यावर्षी २२.६१ असणारा जलसाठ्याची स्थिती यंदा चांगली असून, लघुप्रकल्पात मात्र अवघा १९.४२ टक्के जलसाठा आहे. मात्र पावसाची सद्य:स्थिती पाहता साठा वाढण्याची शक्यता आहे. सध्यातरी धुळे जिल्ह्यात पाणीटंचाई नाही.

जिल्ह्यात धुळे व साक्री तालुक्यातील काही भाग वगळता जोरदार पावसाची कमतरता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे धाब्याची घरे गळू लागली आहेत.

जिल्ह्यातील तेरा पैकी पांझरा, जामखेडी, मालनगाव हे तीन प्रकल्प जुलै मध्येच शंभर टक्के भरले असून, बुराई प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. त्यात ९४.५१ टक्के जलसाठा आहे.

Water level at Dam reference image
Nashik Crime : 2 लाखाचा गांजा जप्त; दोघांना अटक

अक्कलपाड्याचे १७ गेट एक मीटर उघडले

जिल्ह्यात लघू व मध्यम प्रकल्पात सध्या १७७.४६२ दशलक्ष घनमीटर एवढा जलसाठा आहे. गेल्यावर्षी १११.९१ दशलक्ष घनमीटर साठा होता. जूनपासून आजपर्यंत २५२.२ टक्के मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या १३४.४ टक्के पाऊस झाला आहे.

प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या शक्यतेने अक्कलपाडा धरणाचे १७ गेट एक मीटर उघडले असून, त्यातून २२ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सुलवाडेचे तीन गेट पूर्णपणे उघडण्यात आले असून ३५ हजार ५०५ क्सूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

धुळे जिल्ह्यात बारा मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची एकूण क्षमता ४९४.८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी असून, सध्या १७७.४६२ दलघमी साठा आहे. लघुप्रकल्पांची जलसंचयन क्षमता १२१.९७ दशलक्षघनमीटर एवढी असताना सध्या २३.६९२ दशलक्षघनमीटर म्हणजे १९.४२ टक्के जलसाठा आहे.

मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता ४७१.४३ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १५३.७७ दशलक्षघनमीटर म्हणजेच ४१.२४ टक्के जलसाठा आहे. सर्वात कमी म्हणजे १०.३१ टक्के जलसाठा अमरावती धरणात आहे. याशिवाय कनोली, सोनवद, वाडीशेवाडी यांच्यात १५ टक्केपेक्षा कमी जलसाठा आहे. परिसरातील जामफळ, देवभाने, सातपायरी धरणात २५ टक्केहून कमी जलसाठा आहे.

प्रकल्प, जलसाठा टक्केवारी

पांझरा - १००

मालनगाव - १००

जामखेडी - १००

कनोली - १२. ४३

बुराई - ९४.५१

करवंद - २८.०४

अनेर - ३४.१२

सोनवद - १८. ९४

अमरावती १०.३१

अक्कलपाडा - ३४. ५८

वाडीशेवाडी - १०.८५

सुलवाडे - २८.८३

एकूण मध्यम प्रकल्पात - ४१. २४

एकूण लघु प्रकल्पात - १९. ४२

एकूण जलसाठा - ३५.८६

Water level at Dam reference image
NAMCO बँकेला रिझर्व्ह बँकेकडून 50 लाखाचा दंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com