अमळनेर- घरगुती सिलिंडरचा बेकायदेशीरपणे साठा करून त्यातील गॅस खासगी वाहनात भरण्याच्या अवैध व्यवसायावर अमळनेर पोलिसांनी छापा टाकला. शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या या छाप्यात तब्बल ३८ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकूण चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.