जळगाव- जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. साधारणत: आत्महत्यांच्या कारणांमध्ये कमी पाऊस, कोरडा दुष्काळ, नापिकीमुळे, अशी सांगितली जातात. यंदा १२० टक्के पाऊस पडल्यावरही जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विदारक चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने ४०पैकी तीनच मदत प्रस्ताव मंजूर केले, तर २६ मदत प्रस्ताव प्रलंबित आहेत. यात ११ प्रस्ताव अपात्र म्हणून फेटाळल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.