अमळनेर- तालुक्यातील सात्री गावातील गावठाण भागात गेल्या आठवड्यात आग लागली, तेव्हा अग्निशमन दलाचे वाहन फसले होते. यासारखे भविष्यात काहीही संकट येऊ शकते, त्यामुळे रस्ता अत्यंत आवश्यक आहे. .म्हणून दोन्ही पक्षांनी सामंजस्याने रस्त्याला संमती द्यावी, अन्यथा प्रशासन कायद्याने निर्णय घेईल, त्या वेळी शेतकऱ्यांचा फायदा होईल की नुकसान, ते सांगता येणार नाही, असा सूचनावजा इशारा येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी अधिकारी व सात्रीतील ग्रामस्थांच्या बैठकीत दिला. यावर दोन्ही बाजूंकडून ४० फूट रुंदीचा रस्ता देण्यास प्राथमिक चर्चेत संमती देण्यात आली. त्यानुसार प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी व रस्त्याची आखणीही लवकरच करण्यात येणार आहे..स्वातंत्र्यपूर्व काळापासून रस्ताच नसलेले सात्री हे महाराष्ट्रातील आगळेवेगळे गाव आहे. हे गाव निम्नतापी प्रकल्प पाडळसरे धरणात बुडीत क्षेत्रात आहे व पुनर्वसनही होत नाही. नुकतीच लागलेली आग, तीन-चार जणांचा उपचाराअभावी झालेला मृत्यू, साथीचे रोग, पावसाळ्यात गर्भवती महिलांचे इतरत्र स्थलांतर करावे लागते, शालेय विद्यार्थ्यांची शाळा बंद होते, इतर कामे ठप्प होऊन गावाचा संपर्क तुटतो म्हणून पर्यायी रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. .या गावाला आधी गिरणा पाटबंधारे प्रकल्पात पाटचारीसाठी भूसंपादन करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र, येथील पाटचारीला पाणीच येत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी पुन्हा त्या जमिनीवर ताबा बसवला आहे. याच पाटचारीच्या जागेवर पर्यायी रस्ता करण्याचे शासनाने ठरवले आहे. मात्र, पाटचारी सुरू असल्याचे उच्च न्यायालयातला दर्शवून या कामाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, सत्य परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनतर उच्च न्यायालयाने रस्त्याला नडणारे अतिक्रमण काढू शकतो, असे निर्देशित केले आहे..शिवाय गिरणा पाटबंधारे प्रकल्पात असलेले सर्व क्षेत्र तापी महामंडळात वर्ग झाल्याने त्यावर अधिकार तापी महामंडळ म्हणजे निम्नतापी प्रकल्पाचा आहे. अशा जमिनी शेतकऱ्यांना परत देता येत नाहीत, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, असे प्रांताधिकारी मुंडावरे यांनी सांगितले. हा रस्ता फक्त २५ फूट रुंदीचा आहे. त्याच्यासोबत दोन्ही बाजूला गटारी कराव्या लागणार असल्याने सुमारे ४० फूट रुंदीचा रस्ता मोकळा करावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी संमतीने ४० फूट रुंद रस्त्याला परवानगी द्यावी, अन्यथा प्रशासन आमच्या पद्धतीने कारवाई करेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला..अखेर दोन्ही बाजूंकडून होकारअमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्राथमिक स्तरावरील बैठकीत दोन्ही बाजूंकडून होकार दर्शविण्यात आला आहे. येत्या बुधवारी सर्व संबंधित अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी व रस्त्याची आखणी करणार आहेत. या बैठकीला तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार कुलकर्णीं, निम्न तापी प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता जितेंद्र याज्ञिक, मंडळाधिकारी वाय. एच. न्हाळदे, ग्राममहसूल अधिकारी परवर तडवी, सात्री गावचे सरपंच महेंद्र बोरसे, पोलिसपाटील विनोद बोरसे, राजेंद्र पाटील, पुनिलाल पाटील, मनोहर पाटील, संजय पाटील, नईम शेख आदी उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.