काजीसांगवी- दिघवद (ता. चांदवड) येथे ग्रामपंचायत कार्यालयावर गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांना घेराव घातला. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून ४४ गाव पुरवठा योजनेचे पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भंटकंती करावी लागत आहे.