Dhule News: धुळे तालुका शिक्षण विभागात 47 पदे रिक्त; पदवीधर शिक्षकांची संख्या अधिक

teacher
teachersakal

Dhule News: धुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांची सुमारे ४७ पदे रिक्त आहेत. यात पदवीधर शिक्षकांची संख्या अधिक आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे उपलब्ध शिक्षकांना प्रभारी काम करण्याची वेळ आलेली आहे.

यातच पुरसे शिक्षक नसल्याने तालुक्यातील साडेपाच हजारावर विद्यार्थ्यांचे आधार उपलब्ध नाही. यासह ही रिक्तपदे भरण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

धुळे तालुक्यात दोन वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एका शिक्षकाला अधिकचे वर्ग सांभाळावे लागत आहेत. पदवीधर शिक्षकांची अधिक पदे रिक्त आहेत. (47 Vacancies in Dhule Taluka Education Department news)

परिणामी इंग्रजी, विज्ञान व गणित विषयाचे अध्यापनात मोठी अडचण निर्माण झाली आहे. रिक्तपदांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलत आहे. शिक्षकांच्या मेहनतीने गुणवत्तेत वाढ होत आहे. अशा स्थितीत रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांचे अधिकचे नुकसान होत आहे.

५५०० विद्यार्थ्यांचे आधार नाही

धुळे तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात ८३ हजार दोनशे विद्यार्थी यांचे आधार अद्ययावत करण्यात आले आहेत. तर युडाईसमध्ये ३ हजार विद्यार्थी इनव्हॅलीड आहेत तर १ हजार ४९२ विद्यार्थी यांची अद्यापही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. तसेच ५ हजार ७४५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड उपलब्ध नाही.

असे एकूण ९३ हजार ६३५ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. आधार उपलब्धतेसाठी प्रत्येक शाळेत आधार कॅम्प लावणे गरजेचे आहे. पंचायत समितीच्या मासिक बैठकीत प्रत्येक वेळेस चर्चा होवूनही जैसे थे स्थिती असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

teacher
Teacher Bharti Portal: शिक्षक भरतीसाठी 15 दिवसांत सुरू होणार पोर्टल; शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

तालुक्यातील शिक्षक संख्या, मंजूर, रिक्तपदे

पद मंजूर पदे कार्यरत रिक्त

शिक्षणविस्तार अधिकारी ९ ६ ३

केंद्रप्रमुख १९ १० ९

मराठी माध्य. उपशिक्षक ९१६ ८३५ ११

उर्दू माध्य. उपशिक्षक २२ २२ ०

मराठी पदवीधर शिक्षक ३९ १८ २१

उर्दू पदवीधर शिक्षक ६ ७ १

मराठी पदोन्नती मुख्याध्यापक ७० ६४ ३

उर्दू पदोन्नती मुख्याध्यापक २ २ ०

एकूण / १०८३ / ९६४ / ४७

"शिक्षण विभागाकडे शासनाचे लक्ष नाही. वर्षभरापासून जागा शिक्षकांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे. अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक करून हा प्रश्न सोडवता येईल.'' - राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य

teacher
TET Exam: शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारीत; पहिल्यांदाच ऑनलाइन आयोजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com