अमळनेर- अधिकाऱ्यांच्या चुकीने मॅपिंग झालेल्या गटाचा समावेश भूमिअभिलेखमध्ये गेला. त्यामुळे अनेक वर्षे मालमत्ता पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) न मिळणाऱ्या नागरिकांना अखेर खासदार स्मिता वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या आदेशाने सातबारा उतारा मिळाला. दरम्यान, आपल्या घराचा सातबारा मिळाल्याने ‘त्या’ ६१ घरमालकांनी समाधान व्यक्त केले आहे.