Dhule News : नेवाडेत विषबाधेमुळे अकरा मोरांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dead peacock on the banks of river Tapi.

Dhule News : नेवाडेत विषबाधेमुळे अकरा मोरांचा मृत्यू

चिमठाणे (जि. धुळे) : नेवाडे (ता. शिंदखेडा) येथील गावशिवरातील तापी नदीकाठावर बुधवारी (ता. १) सात नर व चार मादी जातीच्या मोरांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. (7 male 4 female peacocks died due to poisoning on banks of Tapi river dhule news)

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोरांचे नमुने नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. नेवाडे येथील तापी नदीपात्राजवळ बुधवारी विषबाधेमुळे अकरा मोरांचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाचे वनपाल नितीन मंडलिक व वनरक्षक नितीन थोरात यांना मिळाल्यावरून पशुवैद्यकीय विस्ताराधिकारी डॉ. भरत देसले, डॉ. उमेश सोनवणे, डॉ. महेश पिंगळकर,

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

सहाय्यक डॉ. देसले यांनी जागेवर जाऊन शवविच्छेदन करून नमुने नाशिक येथील मेरी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. तापी नदीपात्रातील मासे किंवा विषारी पाण्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.