Nandurbar News : महावीर स्वामी निर्वाण महोत्सवानिमित्त 75 किलोचा लाडू

Jain community members and women devotees participating in the Mahavir Swami Nirvana festival organized by the Digambar Jain Samaj here.
Jain community members and women devotees participating in the Mahavir Swami Nirvana festival organized by the Digambar Jain Samaj here.esakal

Nandurbar News : शहरातील दिगंबर जैन समाजातर्फे महावीर स्वामी यांच्या २५५० वा निर्वाण महोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.(75 kg Laddu on occasion of Mahavir Swami Nirvana Festival nandurbar news)

शहरातील माणिक चौक परिसरात असलेल्या दिगंबर जैन समाजाच्या सर्व सिद्धीदायक १००८ अजितनाथ दिगंबर जैन मंदिरात कार्तिक अमावस्या निमित्त सोमवारी विविध धार्मिक उपक्रम घेण्यात आले.

यावेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षकालनिमित्त ७५ किलोच्या लाडूचा प्रसाद महावीर भगवान चरणी अर्पण करण्यात आला.लाडूचा महाप्रसाद बनविण्यासाठी महिला मंडळाचे अमूल्य योगदान ठरले.

Jain community members and women devotees participating in the Mahavir Swami Nirvana festival organized by the Digambar Jain Samaj here.
Nandurbar News: सातपुड्यात आढळला दुर्मिळ विषारी बांबू पीट वायपर! अस्तंबा ऋषी यात्रेकरूंना सापाचे दर्शन

डीजे आणि इतर वाद्य पर्यावरणाला पूरक नसून पारंपारिक पद्धतीने सनई वादन लावून धार्मिक उपक्रम घेण्यात आले.अशी माहिती दिगंबर जैन समाजप्रमुख आणि दिगंबर जैन समाज महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी दिली.

याप्रसंगी कार्यक्रमास आबाल वृद्धांसह युवती, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिगंबर जैन समाज आणि महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. विजय अजमेरा यांनी सूत्रसंचालन केले.

Jain community members and women devotees participating in the Mahavir Swami Nirvana festival organized by the Digambar Jain Samaj here.
Nandurbar News : आदिवासी संस्कृती टिकवायची असेल तर बोली भाषेची समृद्धी जोपासावी लागेल : राज्यपाल रमेश बैस

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com