
Dhule : हॉटेलसह 8 घरफोड्या
निमगूळ (जि. धुळे) : दोंडाईचा शहरात शनिवारी (ता.११) मध्यरात्रीतून एका हॉटेलसह विविध ठिकाणी घरफोड्या (Burglary) झाल्या आहेत. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे. (8 burglaries including Hotel in Nimgul Dhule Crime News)
शहरातील पटेल कॉलनीत चार घरफोड्या, हरचंद नगरमधील अजय पॅलेसमध्ये चोरी तर हुडको कॉलनीत दोन अशा आठ ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या. दोंडाईचात या आठ घरफोड्यांमुळे व्यावसायिकांसह नागरिक भयभीत झाले असून, चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. गेल्या वर्षभरात घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी (ता.११) रात्री झालेल्या चोऱ्यांमध्ये तीन ठिकाणी अजय पॅलेस हॉटेलमधून सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी टीव्ही, ३२ हजाराची रोकड, मद्य यासह ७२ हजार २०० मुद्देमाल लंपास केला.
हेही वाचा: पारोळ्यात कैरी बाजाराला सुरवात; लोणच्यासाठी ‘सरदार’ला पसंती
पटेल कॉलनीत संजय पंडित पाटील यांच्या घरातून ४० हजार रोख व २३ ग्रॅम सोने गेल्याचे उघडकीस आले. उर्वरित ठिकाणी किरकोळ वस्तू गेल्या आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व दिवसा रेकी होत असताना त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असून, पोलिसांनी कामाची पद्धत बदलावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
हेही वाचा: Jalgaon : पावसाने तालुक्यातील 6 गावांत घरांचे नुकसान
Web Title: 8 Burglaries Including Hotel In Nimgul Dhule Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..