Nandurbar News : महिला, विद्यार्थ्यांसह वंचित घटकांनी मतदार नोंदणी करावी; 9 डिसेंबर अंतिम मुदत

nandurbar district collector manisha khatri
nandurbar district collector manisha khatriesakal

Nandurbar News : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात २७ ऑक्टोबर २०२३ पासून नागरिकांकडून दावे, हरकती म्हणजेच मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदणीची दुरुस्ती व नावे वगळण्यासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच त्यात नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने विशेष शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. (9 December deadline for voter registration nandurbar news)

जिल्ह्यातील नागरिक महिला, दिव्यांग, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसह दावे व हरकतींसाठी ९ डिसेंबर २०२३ ही अंतिम मुदत असून, या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी नवयुवकांची भूमिका महत्त्वाची असून, मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त युवकांची मतदार नोंदणी व्हावी यासाठी प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

nandurbar district collector manisha khatri
Nandurbar News : अपघात टाळण्यासाठी वाहनांना रेडियम स्टिकर; तळोदा पोलिस ठाण्याचा उपक्रम

महिला, दिव्यांग व विद्यार्थी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजनदेखील करण्यात आले असून, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासह समाजातील दिव्यांग, तृतीयपंथी, वंचित घटक यांचा मतदार प्रक्रियेत सहभाग वाढवा यासाठीही प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्यात येत आहे.

राजकीय पक्षांना आवाहन

संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ साठी ९ डिसेंबर २०२३ हा दावे, हरकती व मतदार नोंदणीचा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिवस असून, जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नागरिकांमध्ये अधिकाधिक मतदान नोंदणी होईल याबाबत आवाहन करून जनजागृतीबाबत व या कार्यक्रमात सहभाग घेऊन १८-१९ वर्षांवरील सर्व युवक-युवतींची मतदार नोंदणी करून घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी खत्री यांनी केले आहे.

nandurbar district collector manisha khatri
Nandurbar News : 2 लाख नागरिकांचे स्कॅनिंग करणार : पालकमंत्री अनिल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com