
टॅंकर उलटल्याने त्यातील नऊ ते दहा हजार लिटर डिझेल जमिनीवर पडले. सुदैवाने जीवितहानी टळली.
नेर : भरधाव वाहनाने हुलकावणी दिल्याने डिझेलने भरलेला टॅंकर उलटून सुमारे दहा हजार लिटर डिझेल रस्त्यावर सांडले गेले. हा अपघात नेरजवळील सुरत-नागपूर महामार्गावरील पांझरा नदीकाठावरील मोठ्या पुलाच्या वळणावर झाला.
आवश्य वाचा- शेतकऱ्यास तळोदा तहसीलदरांच्या नावे बनावट दाखला
रविवारी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात सुदैवाने टॅंकर न पेटल्याने अनर्थ टळला. अहमदाबादहून औरंगाबादकडे (एमएच ४६, बीबी २५९०) डिझेलने भरलेला टॅंकर रविवारी रात्री जात असताना, समोरील वाहनाने हुलकावणी दिल्याने रात्री अकराला उलटला. टॅंकरमध्ये २५ हजार लिटर डिझेल होते.
उडी मारून वाचविला जीव
टॅंकर उलटल्याने त्यातील नऊ ते दहा हजार लिटर डिझेल जमिनीवर पडले. सुदैवाने जीवितहानी टळली. चालक व सहचालकाने प्रसंगावधान राखून शेतात उडी मारल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.
महत्वाची बातमी- गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची शिकार; लढविली होती शक्कल
आवाज एकल्याने पोलिस धावले
अपघात झाल्याने टँकरचा उलटातच मोठा आवाज झाला. हा आवाज एकल्याने नेर दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचारी राकेश मोरे तत्काळ घटनास्थळी मदतीसाठी धावले. जखमीला उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलविले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
संपादन- भूषण श्रीखंडे