Breaking : नंदुरबारमध्ये जीप दरीत कोसळली; सहा मजुरांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

तोरणमाळ खडकी रस्त्यावर आज सकाळी जीप दरीत कोसळल्याची भिषण घटना घडली.

नंदुरबार :  जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तोरणमाळ खडकी रस्त्यावर आज सकाळी जीप दरीत कोसळल्याची भिषण घटना घडली. या घटनेत सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून जीप मध्ये आणखी मजूर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर जखमींना तोरणमाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे 

नंदुरबार, धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तोरणमाळ येथील खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या जीप चालकाचा घाट रस्त्यावर ताबा सुटल्याने जीप चारशे मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनांचा देखील मोठे नुकसान झाले आहे.

जीपमध्ये २५ पेक्षा अधिक मजूर

जीपमध्ये 25 पेक्षा अधिक मजूर असल्याचे माहिती समोर येत आहे. अपघातात आतापर्यंत सहाजण दगावले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालात पाठविले

चारशे फुट दरीत गाडी कोसळल्याने मतद कार्यकरण्यास अडचणी येत आहे. तरी स्थानीक रहिवासी ,पोलिस,  वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या मदतीने गंभीर जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालय व म्हसावद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अतिगंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

टिप ः घटनेचे सविस्तर वृत्त काही वेळाने अपडेट होईल.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident marathi news nandurbar jeep crashed valley six laborersi deth