मतदान करुन परतणा-यांचा अपघात; १ बालक ठार तर १४ जण जखमी

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पिंपळगाव रस्त्यावर सोनजांब फाट्यानजीक (ता.२१) मतदान करुन परतणाऱ्या शेतमजुराची पिकअप गाडी पलटी होऊन १ बालक ठार तर १४ जण जखमी झाले आहे. धोंडगव्हानवाडी (ता. चांदवड) येथे द्राक्षबागात मजुरी करणारे सुमारे २२ शेतमजुर दिंडोरी तालुक्यातील मुळगाव असलेल्या पिंपळपाडा येथे मतदानासाठी गेले होते. मतदान करुन परतीच्या प्रवासात असतांना वणी-पिंपळगाव मार्गावर सुमारे साडेचार वाजेच्या सुमारास सोनजांब फाट्यानजीक पिकअप चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व पिकअप बाजुच्या खड्ड्यात पलटी झाली. 

वणी : पिंपळगाव रस्त्यावर सोनजांब फाट्यानजीक (ता.२१) मतदान करुन परतणाऱ्या शेतमजुराची पिकअप गाडी पलटी होऊन १ बालक ठार तर १४ जण जखमी झाले आहे. धोंडगव्हानवाडी (ता. चांदवड) येथे द्राक्षबागात मजुरी करणारे सुमारे २२ शेतमजुर दिंडोरी तालुक्यातील मुळगाव असलेल्या पिंपळपाडा येथे मतदानासाठी गेले होते. मतदान करुन परतीच्या प्रवासात असतांना वणी-पिंपळगाव मार्गावर सुमारे साडेचार वाजेच्या सुमारास सोनजांब फाट्यानजीक पिकअप चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व पिकअप बाजुच्या खड्ड्यात पलटी झाली. 

१ बालक ठार तर १४ जण जखमी
या अपघातात किशोर वामन पवार (वय ६) हा बालक जागीच मयत झाला आहे. तर भारती मधुकर पवार (वय २५), कविता रोहीदास पवार (वय २५) भाग्यश्री मोहन डोंगळे (वय ७), करण मोहन डोंगळे (वय ५), मुकुंदा रोहीदास पवार (वय ६), निर्मला माधव पवार (वय २१), धनश्री रविंद्र धुळे (वय ८), वर्षा माणिक कडाळे (वय ७), पुंडलीक माणिक कजाळे (वय १०), माधव पांडुरंग पवार (वय २४), माणिक एकनाथ कडाळे (वय ३०), सोमनाथ धुळे (वय ३०), लिला पवार (२८), दिलीप पवार (३०) सर्व राहणार पिंपळपाडा तालुका दिंडोरी जि. नाशिक हे सर्व जखमी झाले आहे. तसेच अन्य काही जखमी झाले आहे. सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवीण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच डॉक्टरांनी वणी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमींवर उपचार केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनी वणी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन अपघातग्रस्तांची भेट घेतली.

रुग्णालयातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत
वणी ग्रामीण रुग्णालयात असलेले इन्वर्टर नादुरुस्त असल्याने काही मिनीटांसाठी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे डॉक्टरांनी मोबाईलची बॅटरी लाऊन उपचार केले. त्यातच रुग्णालयात एकच उपस्थित असलेले वैद्यकिय अधिकारी व एकच परिचारीका उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident of returning voters