Dhule News : गांजा बाळणाऱ्या चौघांवर कारवाई; 60 हजाराचा मुद्देमाल जप्त, एक जण फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Dhule News : गांजा बाळणाऱ्या चौघांवर कारवाई; 60 हजाराचा मुद्देमाल जप्त, एक जण फरार

धुळे : वलवाडी शिवारातील सुशिनाल्याजवळ गांजा बाळगणाऱ्यांवर पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कारवाई केली. त्यात गांजासह ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यात संशयित तिघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच अन्य एक जण पसार झाला.

शहराचे पोलिस उपअधीक्षक हृषिकेश रेड्डी यांना वलवाडी शिवारातील अमरधाम येथे चौघे जण गांजा बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्री. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख यांच्यासह पथकाने कारवाई केली. (Action against four people carrying ganja Sixty Thousand worth of valuables seized in Dhule one absconding Dhule News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Jalgaon News : शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणेंना दिलासा

छाप्यात राहुल सुरेश मोहिते (वय २६, रा. दैठणकर नगर, देवपूर), भटू रंगनाथ ठाकरे (२३), संतोष शिवदास मोरे (३८, दोघे रा. वलवाडी), बापू ठाकरे (रा. इंदिरा नगर, देवपूर) या चौघांकडे विक्रीच्या उद्देशाने गांजा आढळला. संशयित बापू ठाकरे हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

उर्वरित संशयित तिघांना पथकाने नऊ हजार ६०० किमतीचा गांजा, ५० हजार किमतीचे चार मोबाईल व एक हजार ६० रुपयांची रोकड, अशा एकूण ६० हजार ६६० किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. नंतर पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे हवालदार पुरुषोत्तम सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik News : लेखा विभागाचे हात दाखवून अवलक्षण