भुसावळ- खासगी रुग्णालयांनी १५ प्रकारच्या सेवांबाबत दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असताना भुसावळमध्ये या नियमांना बगल दिली जात आहे. शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावण्यास टाळाटाळ केली जात आहे. .विशेष म्हणजे, रुग्णाचा मृत्यू झाल्यावर बिलाची रक्कम वसूल करण्यासाठी मृतदेह अडवून ठेवण्यापर्यंत रुग्णालयांमध्ये घटना घडत आहेत. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित रुग्णांलयांवर कारवाई करण्याचे व जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना तपासणीचे पत्राद्वारे निर्देश दिले आहेत..‘कोविड’सारख्या महामारीच्या काळात आरोग्यसेवेचे धिंदवडे निघाले. सरकारी आरोग्य व्यवस्था तोकडी पडल्यानंतर सरकारच्या आदेशान्वये खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांनी उपचार घेतला. आरोग्य व्यवस्था सक्षम असणे किती गरजेचे आहे, हे त्या वेळी सरकारी यंत्रणेच्या लक्षात आले होते. भुसावळ तालुक्यात सरकारी ट्रामा केअर सेंटर तथा उपजिल्हा रुग्णालय सोडल्यास सर्व आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया होतील, असे एकही सुसज्ज सरकारी रुग्णालय नाही. त्यामुळे भुसावळ नगरपालिकेच्या हद्दीत खासगी रुग्णालयांचे पेव फुटले आहे. पूर्वी शहरापुरते मर्यादित असणारे खासगी रुग्णालये आता मोठ्या प्रमाणात उघडली आहेत. .या रुग्णालयांमध्ये प्रसूती रुग्णालय, रस्ते अपघात, ट्रॉमा केअर सेंटर, आयव्हीएफ, आगीने भाजलेल्या रुग्णांवर उपचार, तसेच विविध आजारांवर खर्चिक उपचार असणारी रुग्णालये शहरात सुरू झाली आहेत. कोणत्याही खासगी इमारतीमध्ये विनापरवानगी भौतिक बदल करीत रुग्णालये चालविली जात आहेत. अशा घटनांबाबत सामाजिक कार्यकर्ता जयराज पवार (रा.आचेगाव, ता. भुसावळ) यांनी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याकडे कारवाई संदर्भात निवेदन दिले आहे..विविध पालिकांना दिले कारवाईचे पत्रमहाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी सुधारित नियम २०२१ मधील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी जळगावचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, पारोळा; तर अमळनेर, अमळगाव, धरणगाव, यावल, न्हावी, भुसावळ, वरणगाव, रावेर, पाल, सावदा, बोदवड, पाचोरा, पिंपळगाव (हरेश्र्वर), भडगाव, चाळीसगाव, मेहुणबारे, पहूर, एरंडोल आदी ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या परिक्षेत्रातील सर्व रुग्णालयांना महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट १९४९ सुधारित २०२१ नुसार १५ वैद्यकीय सेवांचे दरपत्रक दर्शनी भागात ठळकपणे लावणे बंधनकारक करावे, तसेच खासगी रुग्णालयांनी पैशांअभावी रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नये, असे आदेशात म्हटले असून, जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी आता कोणती भूमिका घेतात, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे..जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत लवकरच खासगी रुग्णालयांना अचानक भेटी देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या कार्यवाहीत जे रुग्णालय नोटीस दिल्यावरही नियमांची पूर्तता करणार नाहीत, अशांवर कठोर कारवाई केली जाईल. कारवाईत परवाना रद्दची तरतूद आहे.- डॉ. किरण पाटीलजिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.