
जळगाव ः जिल्ह्यात हॉटेल्स, स्पा, रेस्टांरेंट, बिअरबार वगळता सर्व दुकाने सुरू राहतील असे काल जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगलेही उपस्थित होते. असे असताना आज जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केट, कॉम्प्लेक्स, मार्केट बंद राहतील असे आदेश काढले असून सर्वच दुकानांमध्ये मॉल, कॉम्प्लेक्स, मार्केटचा समावेश नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आदेशांचा खेळ खेळविला जात असल्याचे दिसून येत आहे.
काढलेल्या आदेशानुसार आता महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील सर्व मॉल, कॉम्पलेक्सस, मार्केट बंद राहतील. मात्र मार्केट व मार्केट कॉम्प्लेक्समधील केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील.
सर्व सायकल रिक्षा, ऑटो रिक्षा बंद राहतील. ऑन कॉल रिक्षा सुविधा उपलब्ध असतील. सर्व प्रकारची केश कर्तनालये, स्पा सेंटर, सलून पूर्णपणे बंद राहतील.
एकल दुकाने सुरू
शहरातील ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. ते क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील सर्व स्वतंत्र ठिकाणी असलेली दुकाने, रहिवासी संकुलातील सर्व दुकाने, कॉलनी मधील दुकाने (सर्व दुकाने) सुरू राहतील. सर्व संबंधित ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन आवश्यक राहील.
ग्रामीण भागात सर्व दुकाने सुरू
ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र व मॉल वगळता सर्व दुकाने सुरू राहतील. ई कॉमर्स कंपन्यांना केवळ अत्यावश्यक वस्तू, औषधे वैद्यकीय उपकरणे यांचीच सेवा पुरविता येईल.
खासगी कार्यालये 33 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. उर्वरित कर्मचाऱ्यांना वर्क फ्रार्म होम ची सुविधा देता येईल.
शासकीय कार्यालये 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. आरोग्य, पोलिस, तुरुंग, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन व इतर आनुषंगिक कार्यालये कोणत्याही बंधनाशिवाय सुरू राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.