तब्बल 24 वर्षांनी अतिदुर्गम हुंडा रोषमाळला पोहचली बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल 24 वर्षांनी अतिदुर्गम हुंडा रोषमाळला पोहचली बस

तब्बल 24 वर्षांनी अतिदुर्गम हुंडा रोषमाळला पोहचली बस

धडगाव : तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या हुंडा रोषमाळ येथे चोवीस वर्षानंतर अक्कलकुवा आगाराची बससेवा सुरु झाली आहे. चोवीसवर्षांपूर्वी या गावाला शहादा आगारातून बस देण्यात आली होती.

अक्कलकुवा आगाराच्या बससेवा सुरु झाल्याने २४ वर्षापासून लालपरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची प्रतिक्षा संपली असल्याची भावना गावकरी नागरिक व्यक्त करीत आहेत. ही बस मुक्कामी असून याचा मार्ग अक्कलकुवा मोलगी धडगाव हुंडा रोषमाळ असा रूट असणार आहे. या बससेवेमुळे नर्मदा काठावरील रोषमाळ खुर्द, दु डुठ्ठल,चिचकाठी, बोरसिसा, गोराडी, पिप्री, आमलीपाणी, अट्टी, केली, थुवाणी, भरड, सिक्का, कुंबरी, अकवाणी, नळगव्हण, कुकतार, जलोला अशा १९ गावातील नागरिकांना बससेवेचा लाभ होणार आहे.

हेही वाचा: निंभोऱ्यात विधवा प्रथा बंद! ग्रामसभेत ठराव मंजूर; महिलांमध्ये समाधान

यावेळी संगीता पावरा, जि.प.सदस्य हारसिंग मल्या पावरा, माजी सदस्य श्री. वडनेरे , बाजीराव वसावे, आगर लेखाकार, दौलत पाडवी, बसचालक के. पी. पाटील, वाहक जयसिंग तडवी, बलसिंग पावरा, विजय पावरा, लालसिंग पावरा, बाबूलाल पावरा, शामसिंग पावरा, नाना पावरा, जयवंत पावरा, रवींद्र पावरा आदी उपस्थित होते.

हेही वाचा: धुळ्याचा माला'माल' LIC किंग कंगाल; तिसऱ्या दिवशी 10 कोटींची संपत्ती जप्त

Web Title: After 24 Years The St Bus Start From Remote Area Hunda

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top