VIDEO : अंत्यविधी झाला..एकतर उशीराने शववाहिनी आणली..वरून मद्यधुंदीत हे काय बोलतोय?

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सोमवारी सिडकोतील प्रभाग क्रमांक 27 मधील सह्याद्रीनगर परिसरात नरेंद्र दामोदर सोनार यांचे निधन झाल्याने येथील नागरिकांनी अंत्यविधीसाठी मनपाची शववाहिनी सायंकाळी साडेपाच वाजता बोलाविली. रात्री 9 वाजले तरी शववाहिनी वेळेवर पोहोचू न शकल्याने नागरिकांत संताप पाहायला मिळत होता.यानंतर रात्री साडेदहा वाजता मनपा शववहिनी आली. पण वाहनचालकाची वागणूक पाहून नागरिकांचा संताप अजूनच वाढला.

नाशिक : सिडकोतील प्रभाग क्रमांक २७ मधील सह्याद्रीनगर परिसरात एका व्यक्तीचे निधन झाल्याने येथील नागरिकांनी अंत्यविधी तसेच स्मशानात मृतदेह घेऊन जाण्यासाठी मनपाची शववाहिनी (ता.२) सायंकाळी साडेपाच वाजता फोन करून बोलाविली होती. शववाहिनी बोलावून बराच वेळ झाला होता..अन् इथे अंत्यविधीलीही उशीर होत होता.  रात्रीचे नऊ वाजले तरी शववाहिनी वेळेवर पोहोचली नव्हती. यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले होते. 

मृतदेह घेऊन जायला बोलावली शववाहिनी ...पण वाहनचालक मात्र मद्यधुंदीत..

सोमवारी सिडकोतील प्रभाग क्रमांक 27 मधील सह्याद्रीनगर परिसरात नरेंद्र दामोदर सोनार यांचे निधन झाल्याने येथील नागरिकांनी अंत्यविधीसाठी मनपाची शववाहिनी सायंकाळी साडेपाच वाजता बोलाविली. रात्री 9 वाजले तरी शववाहिनी वेळेवर पोहोचू न शकल्याने नागरिकांत संताप पाहायला मिळत होता. अखेरच्या वेळी नातलगांनी फोनाफानी करून खासगी रथ कसाबसा बोलविला. यानंतर त्या रथात मृतदेह ठेऊन स्मशानपर्यंत घेऊन जाण्यात आले. रात्री उशिराने अंत्यविधी आटोपण्यात आला.

शववाहिनीचा वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत

यानंतर रात्री साडेदहा वाजता मनपा शववहिनी आली. त्यावेळी शववाहिनीचा वाहनचालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला. संबधित वाहन चालक स्वतःचे नांव राजू शिंदे असे सांगत असून त्याने स्वता मद्य प्राशन केल्याचे कबूल केले. तसेच "तुम्हीं आयुक्तांना माझे नांव सांगा" असे तो या व्हिडिओत सांगत आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.अंत्यविधी आटोपल्यानंतर मनपाची शव वाहिनी उशिराने जागेवर पोहचली ! त्यातही वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने नागरिकांकडून मनपाच्या या संवेदनहीन कृतीचा निषेध करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After funeral ambulance driver was delayed due to drunk Nashik Marathi News