Dhule Winter Update : मकरसंक्रांतीनंतर धुळ्याचा पारा 4.7 पर्यंत खाली

संक्रांतीनंतर धुळे शहर व जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. धुळ्यात बुधवारी (ता. २४) किमान तापमानाचा पारा थेट ४.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला.
winter (file photo)
winter (file photo)esakal

Dhule Winter Update : या वर्षी पावसाळा जेमतेम झाल्याने थंडीही जेमतेम असेल असा सामान्य जनतेचा व्होरा होता. अर्थात अगदी मकरसंक्रांतीपर्यंत फारशी थंडी जाणवत नव्हती. त्यामुळे संक्रांतीनंतर पुन्हा थंडी कमी होत जाईल असा अंदाज होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणाची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळत आहे.

संक्रांतीनंतर धुळे शहर व जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. धुळ्यात बुधवारी (ता. २४) किमान तापमानाचा पारा थेट ४.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. त्यामुळे या थंडीने जिल्हावासीयांना अक्षरशः गारठवले आहे. (After Sankranthi cold increased in Dhule city and district minimum temperature dropped to 4 degree Celsius news)

कमी पर्जन्यमान झाल्यानंतर हिवाळ्यातही पाहिजे तशी थंडी जाणवत नव्हती, त्यामुळे यंदा हिवाळ्यातही उन्हाळ्याची झलक पाहायला मिळत होती. मकरसंक्रांतीनंतर थंडी कमी होत जाते. त्यामुळे यंदाही तसा अनुभव येईल व यंदा हिवाळी होता की नाही अशी परिस्थिती जाणवेल असे चित्र होते.

मात्र, मकरसंक्रांतीनंतर थंडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मकरसंक्रांतीपूर्वी कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसवर होता. रात्रीचे अर्थात कमाल तापमान तुलनेने कमी होते. त्यामुळे किमान रात्री थंडी जाणवत होती.

मात्र संक्रांतीनंतर किमान तापमानाचा पारा तर घसरलाच पण दिवसाही नागरिकांना स्वेटर, जॅकेट घालण्याची वेळ आली. गेल्या आठ-दहा दिवसांत थंडीचा हा जोर वाढला आहे. त्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

विशेषतः सकाळी शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने सकाळीच घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही अंगावर स्वेटर, जॅकेट घालूनच बाहेर पडावे लागत आहे.

winter (file photo)
Nashik Winter Update : निफाड 5.6 अंश, नाशिक 9 अंशांवर; राज्‍यात नीचांकी तापमान

विशेषतः प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे.

रात्रीचे तापमान खाली

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी अर्थात १४ जानेवारीला कमाल तापमान ३२.४, तर किमान ११.४ अंश सेल्सिअस होते. मकरसंक्रांतीच्या दिवशी अर्थात १५ जानेवारीला कमाल तापमान ३१ अंशांवर होते.

मात्र किमान तापमानाचा पारा थेट ७.४ अंशांवर आल्याने हुडहुडी भरली. त्यानंतर किमान तापमान ७, ८, ९, १० अंशांदरम्यान राहिले. मात्र, बुधवारी (ता. २४) हा पारा थेट ४.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. त्यामुळे राज्यातील नीचांकी तापमान धुळ्यात नोंदविले गेल्याचे सांगितले जाते.

तापमानाची स्थिती अशी

१४ जानेवारी...३२.०...११.४

१५ जानेवारी...३१.०...७.४

१६ जानेवारी...२८.०...८.०

१७ जानेवारी...२९.०...८.०

१८ जानेवारी...२९.०...९.५

१९ जानेवारी...२८.०...९.५

२० जानेवारी...२८.०...१०.०

२१ जानेवारी...२८.०...७.६

२२ जानेवारी...२७.०...६.३

२३ जानेवारी...२७.०...७.०

२४ जानेवारी...२७.०...४.७

winter (file photo)
Dhule Winter Update : किमान तापमान 8.6 अंशांवर; 5 दिवस ढगाळ वातावरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com