मित्रासाठी शिक्षकांचा असाही आदर्श!

मित्रासाठी शिक्षकांचा असाही आदर्श!
Summary

अशा बिकट परिस्थितीत आपल्या मृत शिक्षकमित्राच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत व्हावी, या हेतूने शिक्षकांनी स्वेच्छेने आर्थिक मदत करावी, अशी पोस्ट व्हॉट्सॲपवर व्हायरल होताच क्षणार्धात त्याला तळोदा तालुक्यातील शिक्षकांनी प्रतिसाद दिला.

तळोदा (नंदुरबार) : आपल्याला सोडून गेलेल्या डीसीपीएसधारक शिक्षक मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मदत (Financial aid) व्हावी, यासाठी शिक्षक (Teacher) वर्ग सरसावला असून, २४ तासांच्या आता जवळपास एक लाख (One lakh) रक्कम जमा केली आहे, तसेच अजूनही अनेकजण मदत (Help) करीत आहेत. शिक्षकांच्या या कृतीतून त्यांनी एकजुटीची व माणुसकीची शिकवण दिली आहे. (After the demise of kisan valvi of zilla parishad school in taloda, his family has been given rs one lakh by the teachers)

मित्रासाठी शिक्षकांचा असाही आदर्श!
नंदुरबार जिल्ह्यात कोविड रुग्णालयातील सव्वाआठशे बेड रिकामे

आमलाड (ता. तळोदा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत किसन वळवी (kisan valvi) यांची नुकतीच प्राणज्योत मालवली. कुटुंबातील कर्ता पुरुष असलेले किसन वळवी अचानक सोडून गेल्याने त्यांचा कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यात वळवी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून, ते डीसीपीएसधारक असल्याने त्यांना निवृत्तिवेतन नाही. त्यांचा मुलगा सातवीत, तर मुलगी दहावीला आहे.

मित्रासाठी शिक्षकांचा असाही आदर्श!
नंदुरबार जिल्ह्याने लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा ओलांडला !

अशा बिकट परिस्थितीत आपल्या मृत शिक्षकमित्राच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत व्हावी, या हेतूने शिक्षकांनी स्वेच्छेने आर्थिक मदत करावी, अशी पोस्ट व्हॉट्सॲपवर व्हायरल होताच क्षणार्धात त्याला तळोदा तालुक्यातील शिक्षकांनी प्रतिसाद दिला. या सर्व प्रक्रियेत गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, अशोक बच्छाव यांनी पुढाकार घेतला असून, त्यास तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक मदत करीत चांगला प्रतिसाद देत आहेत. शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनीही मदत केली.

मित्रासाठी शिक्षकांचा असाही आदर्श!
आशादायक..नंदुरबार जिल्ह्यात ३१६ गावे कोरोनामुक्त

शिक्षकांची अशीही शिकवण

किसन वळवी यांचे मित्र, त्यांच्यासोबत आमलाड शाळेत असलेले शिक्षक धनंजय जाधव मदतनिधी जमा करीत आहेत. आत्तापर्यंत एक लाखाच्या आसपास रक्कम जमा झाली असून, अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. शिक्षकांच्या या कृतीने सर्वांना एकजुटीची व माणुसकीची शिकवण दिली आहे.

शिक्षक वर्ग ज्ञानदानासोबतच आपत्ती व्यवस्थापन, निवडणुका, रक्तदान व आत्ताच्या कोविड काळात विविध कामांमध्ये अग्रेसर आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या एखाद्या शिक्षक बांधवांवर आलेल्या संकटात शिक्षकांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला आहे व आजदेखील त्याची प्रचीती येत आहे.

- शेखर धनगर, गटशिक्षणाधिकारी, तळोदा

(After the demise of kisan valvi of zilla parishad school in taloda, his family has been given rs one lakh by the teachers)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com