Dhule Municipality News : भाजपविरोधात ‘राष्ट्रवादी’च्या अजित पवार गटाचे महासभेत आंदोलन

Mayor Pratibha Choudhary is angry because of the protest over the increased housing issue in the general assembly of the municipal corporation. Neighbors Amita Dagde-Patil, Manoj Wagh. In the second photo, protesters from the Ajit Pawar group of the NCP.
Mayor Pratibha Choudhary is angry because of the protest over the increased housing issue in the general assembly of the municipal corporation. Neighbors Amita Dagde-Patil, Manoj Wagh. In the second photo, protesters from the Ajit Pawar group of the NCP.esakal

Dhule Municipality News : देशात संसदेतील घुसखोरीच्या मुद्यामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच त्याचे प्रतिबिंब येथील महापालिकेच्या महासभेत मंगळवारी (ता. १९) उमटताना दिसले.

जनतेच्या जिव्हाळ्याच्या वाढीव घरपट्टीप्रश्‍नी सत्ताधारी भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महासभेतच घुसखोरी करत वातावरण तापविले. (Agitation by Ajit Pawar faction of Rashtravadi against BJP in Mahasabha dhule municipality news)

त्यामुळे सत्ताधारी भाजपचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे आंदोलक यांच्यात राडा, रेटारेटी, शाब्दिक चकमकी झडल्या. त्यामुळे संतप्त महापौर प्रतिभा चौधरी यांनी महासभेत घुसखोरी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे यंत्रणेला निर्देश दिलेत.

महापालिकेने सर्वसामान्य धुळेकरांवर अन्यायकारक पद्धतीने वाढीव घरपट्टी लादली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी थेट महासभेत बॅनर झळवून महापालिकेचा निषेध केला.

त्यांनी महापौर चौधरी यांच्या आसनापर्यंत जात ‘रद्द करा... रद्द करा... वाढीव घरपट्टी रद्द करा...’, अशी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे महापालिकेचे सभागृह दणाणून गेले. आंदोलकांची महापौरांशी शाब्दिक चकमक उडाली. तथापि, महासभा सुरू असताना सभागृहात अनधिकृत शिरकाव केल्याप्रकरणी संतप्त महापौर चौधरी यांना आंदोलनकर्त्यांवर फौजदारी कारवाईचे निर्देश द्यावे लागले.

Mayor Pratibha Choudhary is angry because of the protest over the increased housing issue in the general assembly of the municipal corporation. Neighbors Amita Dagde-Patil, Manoj Wagh. In the second photo, protesters from the Ajit Pawar group of the NCP.
Dhule Municipality News : संकुलाच्या उत्पन्नावर साडेचार वर्षांनंतरही उत्तर सापडेना; सभापतींचे ‘हात वर’

घरपट्टीचा धगधगता प्रश्‍न

महापालिकेने नागरिकांना अव्वाच्या सव्वा घरपट्टी अर्थात मालमत्ता कर आकारला आहे. त्यामुळे धुळेकरांमध्ये महापालिकेविरोधात रोष आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस ईर्शाद जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर-जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, कार्याध्यक्ष रवींद्र आघाव, एजाज खाटीक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, प्रवक्ता सुरेश अहिरे, महिला शहर अध्यक्षा जया साळुंखे, माजी नगरसेवक उमेश महाले, संजय जगताप, इम्रान पठाण, नरेंद्र अहिरे, संगीता खैरनार, संगीता बोरसे, ज्योती पाचपुते, चंद्रकांत खैरनार, नितीन पाटील, किशोर थोरात, दर्शन पाटील, महेश भामरे, समीर खान, जयेश पाटील, गोपाल देवरे, इजाज शेख, शोएब काजी, ज्ञानेश्वर पाटील, वंदना केदार, रणजित वाघ, भावेश खान, ज्ञानेश्वर माळी, शकील खाटीक आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेविरोधात दंड थोपटले.

सभागृहात गोंधळ

आंदोलनाची पुसटशी कल्पना आल्याने महासभेत सचिव मनोज वाघ यांनी नगरसेवक, पत्रकार व छायाचित्रकार वगळता इतरांनी सभागृह सोडावे, अशी वारंवार सूचना केली. मात्र, तोपर्यंत आंदोलनकर्ते सभागृहात बसले होते. आपल्याला बाहेर काढले जावू शकते, असा अंदाज आल्याने त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभागृह डोक्यावर घेतले. वाढीव घरपट्टी रद्द करा, अशा आशयाचे बॅनर झळकावत आंदोलकांनी व्यासपीठाच्या दिशेने कूच केली. राष्ट्रवादीच्या या आक्रमक आंदोलनामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

धक्काबुक्कीचा आरोप

‘घरपट्टी वाढ रद्द करा’, अशा घोषणा देत आंदोलक व्यासपीठाजवळ पोहचले. तोपर्यंत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक नागसेन बोरसे, सुनील बैसाणे, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे व हर्षकुमार रेलन आंदोलकांजवळ पोहचले. त्यांना हे आंदोलक महापौरांपर्यंत पोहचतील, असे वाटल्याने त्यांनी आंदोलकांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला.

Mayor Pratibha Choudhary is angry because of the protest over the increased housing issue in the general assembly of the municipal corporation. Neighbors Amita Dagde-Patil, Manoj Wagh. In the second photo, protesters from the Ajit Pawar group of the NCP.
Dhule Municipality News : प्लॅस्टिक विक्रेत्यांना महापालिकेचा दणका; 5 टन प्लॅस्टिक जप्त

त्यावरून सत्ताधारी नगरसेवक व आंदोलकांत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला. त्यांनी थेट महापौरांच्या आसनापर्यंत जात बॅनर झळकावले व जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळात धक्काबुक्की झाल्याचा आंदोलकांनी आरोप केला. काही नगरसेवकांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलक पुन्हा घोषणाबाजी देत सभागृहाबाहेर निघाले.

‘राष्ट्रवादी’च्या काळात घरपट्टीत वाढ

घरपट्टीच्या जाचक वाढीतून धुळेकरांना दिलासा मिळावा. महासभेत घरपट्टीवाढीचा ठराव विखंडित करता येऊ शकतो. मात्र, भाजप सत्ताधाऱ्यांनी तो केला नाही. धुळेकरांना दिलासा मिळावा, अशी सत्ताधाऱ्यांची मानसिकता दिसत नाही.

आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना ढकलून दिले, असा आरोप शहर-जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी केला. महापौर चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात घरपट्टी वाढीचा ठराव झाल्याचे स्पष्ट केले. तेव्हा आम्ही भाजपच्या तीन सदस्यांनीच ठरावाला विरोधच दर्शविला होता, असे महापौर चौधरी यांनी ठासून सांगितले.

Mayor Pratibha Choudhary is angry because of the protest over the increased housing issue in the general assembly of the municipal corporation. Neighbors Amita Dagde-Patil, Manoj Wagh. In the second photo, protesters from the Ajit Pawar group of the NCP.
Dhule Municipality News : 7 दिवसात साडेसातशे हरकती दाखल; सुधारित मालमत्ता कर आकारणी प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com