जळगाव- रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचे आरोग्य बिघडत असून, सुपिकता कमी होत चालली आहे. परिणामी, उत्पादन खर्च वाढतो. उत्पन्नावर परिणाम होतो आणि पर्यावरणावरही गंभीर दुष्परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘दहा टक्के रासायनिक खत बचतीची मोहीम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांनी काही सोप्या उपाययोजना अमलात आणल्यास रासायनिक खताचा वापर कमी करता येतो आणि जमिनीचे आरोग्य सुधारते.