जळगाव- खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसगत हेाणार नाही, बोगस बियाणे रोखण्यासाठी १६ नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरिप हंगात शेतकऱ्यांना पुरेसा कर्जपुरवठा करावा, अशा सूचना बँकांना दिल्या आहेत. खते व बियाण्यांची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.