साक्री- सध्या साक्री तालुक्यात खासगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, तालुक्यातील प्रत्येक मोठ्या गावाच्या कोपऱ्यात खासगी मार्केट सुरू होत असल्याचे चित्र आहे. शेतमालाला योग्य भाव मिळून शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत, हा उद्देश यामागे असला तरी, खासगी मार्केट्सद्वारे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याची संधी मिळत आहे. तर दुसरीकडे शेतकरीवर्ग मात्र पिकविलेला माल जड अंतःकरणाने व्यापाऱ्यांना देत आहे.