
नंदुरबार : पोलिसांनी पकडलेले पाच दरोडेखोर अवघ्या दोन तासांतच लॉकअपची मागील बाजूची खिडकी तोडून पळून गेले होते. गुजरात एलसीबीच्या पथकाने गुजरातमधील उच्छल गावाच्या परिसरातील शेतात लपून बसलेल्या एकाची दुसऱ्या दिवशी अटक केली होती. मात्र चौघांचा तपासासाठी नंदुरबार एलसीबीचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले होते. त्यातील अकीलखा पठाण यास मध्य प्रदेशातील खडकावानी येथील शेतात सापळा रचून पकडण्यात आले. त्याला नवापूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Akilakha Pathan arrested from Madhya Pradesh search for three broke lockup and escaped continues Nandurbar Crime News)
हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
५ डिसेंबरला रात्री सव्वाच्या सुमारास नवापूर येथील नवरंग गेटजवळ कोठडा शिवारातील एमआयडीसीकडे जाणारा रस्त्यावर हैदर ऊर्फ इस्राईल इस्माईल पठाण (वय २०, रा. कुंजखेडा, ता. कन्नड), इरफान इब्राहिम पठाण (वय ३५), युसूफ असिफ पठाण (वय २२), गौसखॉ हानिफखॉ पठाण (वय ३४ तिघे रा. ब्राह्मणी गराडा, ता. कन्नड), अकिलखॉ ईस्माईलखॉ पठाण (वय २२, रा. कठोरा बाजार, ता. भोकरदन) हे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असताना एका कारसह (एमएच १३, एन ७६२६ ) मिळून आले होते. त्यांच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सकाळी पावणेसातला त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु कोठडीतून त्यांनी पलायन केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलिस ठाण्याचे ६ वेगवेगळे पथके तयार करून शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचे एक पथक खरगोन जिल्ह्यातील खडकावाणी गावात गेले. गावाच्या बाहेर शेताच्या आजूबाजूच्या परिसरात सापळा रचला; परंतु कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने शेतातील झोपडीतून तो पळून जात असताना पोलिसांनी अकीलखा पठाणला बेड्या ठोकल्या. तिघांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान असून, त्यांनाही लवकरच पकडून बेड्या ठोकण्यात येतील, असा विश्वास जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.