दारुड्यांच्या गर्दीवर आता अर्जाचा उतारा ;उत्पादन शुल्काचा 11 कलमी फतवा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

राज्य उत्पादन विभागातर्फे दारू पिण्यासाठी पूर्वी 18 वर्षे किंवा त्या पुढील व्यक्तीला परवाने देण्यात येत होते. राज्यात कोव्हीड विषाणुचा प्रादुर्भाव पाहता कायद्यातील या तरतुदीचा वापर करून सहज गर्दी टाळता येणे शक्‍य असताना अर्जाचा नवीन फंडा विनाकारण काढण्यात आला आहे. आता मद्य खरेदी करणाऱ्या पेक्षा अर्ज घेण्यासाठी लोक गर्दी करतील यांत शंका नाही. 

जळगाव, :- मद्य विक्रीच्या दुकानांवर होणारी तुडुंब गर्दी आणि त्यातून फिजिकल उिस्टन्सींगचा बोजवारा उडाला असताना. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी नवीन फंड आणला आहे. दारू हवी असल्यास त्यासाठी अर्ज लिहून दिल्यावर दुकानदार टोकन देईल नंतरच दारू मिळेल असे 11 कलमी फर्मान काढण्यात आले आहे. दारुड्यांच्या गर्दीवर आता अर्जाचा उतारा करण्याचा प्रयत्न किती यशस्वी होतो, हे येणाऱ्या काही दिवसांत कळेलच. 

जळगाव सह संपूर्ण राज्यात आणि देशात 45 दिवसांपासून लॉक डाऊन मुळे मद्य विक्री बंद होती. अचानक महसूल वाढीच्या कारणास्तव राज्य शासनाने मद्य विक्रीस परवानगी दिली असून आज पासून सर्वत्र मद्य विक्रीला प्रारंभ झाला. मद्य खरेदीसाठी झालेली गर्दी आणि फिजिकल डिस्टन्सींग च्या नियमांना तुडवत दारू खरेदीसाठी रेटारेटी झाल्याचे सर्वत्र बघायला मिळाले. त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमप यांनी गर्दी टाळण्यासाठी अकरा कलमी फर्मान काढले आहे, त्यानुसार दारू घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. 

असा अर्ज 
दारू घेणाऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, हवा असलेला ब्रॅण्ड आणि संख्या, आदी अर्जात नमूद केल्यावर संबंधित दुकानदार विशिष्ट टोकन या ग्राहकाला देईल व ठरावीक वेळेतच त्याचा नंबर लागेल.आठ तासात व्रिक्री होईल इतक्‍याच लोकांना हे टोकन देता येणार आहे, उर्वरीतांना दुसऱ्या दिवशी बोलवावे, ग्राहकांमध्ये फिजिकल डिस्टन्स पाळण्यात यावे, संबोधित विभागाचे झोन ऑफिसर येथे नियुक्त करण्यात येतील.मास्क सॅनिटायझरसह, दुकानाचा परिसर निर्जंतुक करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. 

कायद्यातील परवाना गायब 
राज्य उत्पादन विभागातर्फे दारू पिण्यासाठी पूर्वी 18 वर्षे किंवा त्या पुढील व्यक्तीला परवाने देण्यात येत होते. राज्यात कोव्हीड विषाणुचा प्रादुर्भाव पाहता कायद्यातील या तरतुदीचा वापर करून सहज गर्दी टाळता येणे शक्‍य असताना अर्जाचा नवीन फंडा विनाकारण काढण्यात आला आहे. आता मद्य खरेदी करणाऱ्या पेक्षा अर्ज घेण्यासाठी लोक गर्दी करतील यांत शंका नाही. 

- ज्ञानेश्‍वर कोळी, 
रांगेतील ग्राहक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alccohol purchessing new rul