रईसजाद्यांना मद्याची खरेदी भोवली ;29 लाखांची गाडीत 37 हजारांची दारु जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

शहरातील श्रीमंत बापाच्या तरुण मुलांनी मोठ्या पार्टिचा बेत आखला होता. त्यासाठी बियर आणि दारुचा स्टॉक फोनवरच बुक करण्यात येवुन चालक सैय्यद मुन्ना सैय्यद बाबू (वय-55) याला वाईन शॉपवर गाडी घेवुन पाठवण्यात आले, गाडी पकडली गेल्यावर काही मिनटातच मालक दाखल झाला. पोलिसांच्या विनवण्याही केल्या मात्र उपयोग झाला नाही. एका मागून एक त्याचे मित्रही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होवुनये म्हणुन धडकले. 

जळगाव,ता. 5 :- शहरातील एका मोठ्या उद्योजकाच्या गाडीतून 37 हजार रुपयांची बियर आणि दारु वाहतुक होत असतांना एमआयडीसी पोलिसांनी गाडीसह मद्यसाठा जप्त करुन गुन्ह्याची नोंद केली आहे. 

जळगाव शहरातील आदर्शनगर येथील रहिवासी आणि बोहरी समुदायातील उद्दयोजक व्यापारी असलेल्या बड्या हस्तीच्या मुलाने आज दारु आणि बियर खरेदीसाठी गाडी पाठवली होती. फोर्ड इंडीवर (एमएच.19.सी.व्ही.10)या एसयुव्ही कार मधुन दारुसाठा वाहून नेण्यात येत असतांना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी विजय नेरकर,जितेंद्र राजपुत, निलेश पाटिल यांनी वाहन थांबवुन तपासणी केली. तपासणीत गाडीत मोठ्या प्रमाणावर बियर आणि महागडी विदेशी दारुचा साठा मिळून आल्याने उपनिरीक्षक संदिप पाटिल, सहाय्यक फौजदार आनंदसींग पाटील, अतुल वंजारी, सचिन पटिल, गाडीसह चालकाला एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चालक सैय्यद मुन्ना सैय्यद बाबुमन्नू(वय-55,आर.वायपार्क जळगाव) याच्या विरुद्ध प्रोव्हीबीशन ऍक्‍ट 65(अ)(ई), भादवी 188 कलम-270 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दारुचा साठा मागवणाऱ्या मुळ गाडीमालकाचा पोलिस शोध घेत असुन तपासात त्याचे नाव निष्पन्न होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांनी दिली. 

जंगी पार्टिचा बेत 
शहरातील श्रीमंत बापाच्या तरुण मुलांनी मोठ्या पार्टिचा बेत आखला होता. त्यासाठी बियर आणि दारुचा स्टॉक फोनवरच बुक करण्यात येवुन चालक सैय्यद मुन्ना सैय्यद बाबू (वय-55) याला वाईन शॉपवर गाडी घेवुन पाठवण्यात आले, गाडी पकडली गेल्यावर काही मिनटातच मालक दाखल झाला. पोलिसांच्या विनवण्याही केल्या मात्र उपयोग झाला नाही. एका मागून एक त्याचे मित्रही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होवुनये म्हणुन धडकले. 

पोलिसांचे फोन-ओ-फ्रेण्ड 
गेल्या महिन्यात लॉकडाऊन काळात आर.के.वाईन्स मधुन मद्यतस्करीच्या प्रकरणात निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह कर्मचारी मनोज सुरवाडे,संजय जाधव, जिवन पाटिल यांना बडतर्फ करण्यात आले. कारण मद्य तस्करीतील भागीदारीमुळे कारवाई करणाऱ्या पथकावर दबाव आणण्याचाही प्रयत्न या लोकांनी केला होता. असे असतांना देखील पोलिस खात्यातील अनेकांनी आजची कारवाई होवु नये यासाठी पथकाला, पोलिस ठाण्यात फोन करुन बड्या बापच्या पोरांसाठी विनवण्या केल्या मात्र, उपयोग झाला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alccohol travaling in ford endever