along with adults children are also turning to addiction of gutkha cigarette nandurbar news
along with adults children are also turning to addiction of gutkha cigarette nandurbar newsesakal

Nandurbar News : नवापूर तालुक्यात गुटख्याचा धुमाकूळ; व्यसधीनतेचे वाढते प्रमाण

Nandurbar News : राज्यात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट या वस्तूंच्या विक्रीवर शासनाने बंदी लावली आहे, ती खाण्यावर व ओढण्यावर सक्ती केली नाही. महाराष्ट्रभर गुटखा विक्रीस बंदी आहे, मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होते. (along with adults children are also turning to addiction of gutkha cigarette nandurbar news)

नवापूर शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी गुटख्याची विक्री होते. यात लहान मुलेही गुटखा खाताना दिसतात. मोठ्या माणसांसोबत लहान मुलेही व्यसनाधीनकडे वळत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. गुटखा कमी पडला की काय म्हणून विशेष नशा चढणारी सिगारेट ओढण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

तालुक्यात गुटख्याचा धुमाकूळ होताच आता सोबतीला सिगारेटही आली आहे, मात्र याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. पालकांनी, स्थानिक गावपुढाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, तरच भावी पिढीचे आयुष्य दीर्घायुष्य होईल.

राज्य शासनाने गुटख्यावर बंदी केली मात्र सर्वांत जास्त गुटखा विक्री महाराष्ट्रात होते. तंबाखूयुक्त गुटखा गावोगावी ठिकठिकाणी सहज उपलब्ध आहे. विविध प्रकारचा तंबाखूयुक्त गुटखा सहज मिळत असल्याने व्यसनाधीन असलेले लोक त्यापासून कसे परावृत्त होतील? उलट गुटख्याचेच आकर्षण मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये मुले-मुली, कामगार महिला यांचा समावेश दिसून येतो. गुटख्यामुळे कॅन्सर या रोगाने बळी जातो, तंबाखूमुळे कॅन्सर होतो, तरीही त्याकडे ओढ दिसून येत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

along with adults children are also turning to addiction of gutkha cigarette nandurbar news
Phalke Smarak : लावणी महोत्सवाचे ‘वाजले बारा’; फाळके स्मारकातील खुले नाट्यगृह बंद!

नवापूर शहरात व तालुक्यात गुटखाबंदी झुगारून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी केली जाते. अनेक वेळा लाखो रुपयांची गुटख्याची तस्करी पोलिस प्रशासनाने पकडली, मात्र त्याच्यावर कधीही लगाम लावू शकले नाहीत, ही शोकांतिका आहे. राज्यात गुटखाबंदी नव्हती तेव्हा एक-दोन रुपयांत पुडी मिळत होती. बंदीमुळे किमान पाच-दहा रुपयाला मिळते. भाव वाढला मात्र तंबाखू पुड्या खाणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही तर ती दुपटी-तिपटीने वाढली.

गुटखा, तंबाखूने कॅन्सर होतो तरीही गुटखा खाण्यापासून कोणी वंचित होताना दिसत नाही. शहरातील, ग्रामीण भागातील खेडोपाडी छोट्या-मोठ्या दुकानांवर रस्त्याच्या कडेला गुटख्याची विक्री खुलेआम होते. बंदी असताना गुटख्याची तस्करी कोण करतो? जागोजागी माल पुरविला जातो.

शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळणार नाही मात्र गुटखा सहज उपलब्ध होतो. प्रशासनाची याला मुभा असल्याशिवाय खुलेआम कशी विक्री होऊ शकते? प्रशासनाची मुभा असल्याशिवाय कुठलाही विक्रेता बंदी असलेल्या वस्तू विकू शकत नाही. तंबाखूयुक्त गुटखा खाल्ल्याने काय विपरीत परिणाम होतात याची जाणीव असतानाही पालक मात्र दुर्लक्ष करताना दिसतात. काही पालक मुलांनाच आणायला पाठवतात, त्यातून मुलेही त्याकडे आकर्षित होतात.

along with adults children are also turning to addiction of gutkha cigarette nandurbar news
RTE Admission : आरटीई प्रवेशाचे शासनाकडे थकले 81.69 कोटी! जिल्ह्यात 4 वर्षांपासून प्रतीक्षा

गुटख्याच्या व्यसनामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन न करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सरकारचे गावपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शाळा व शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व विक्रीस बंदी आहे. यासाठी शाळा प्रयत्नशील असते मात्र शाळा सुटल्यावर रस्त्याच्या बाजूला विक्री होणाऱ्या गुटख्याचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

नवीन समस्या

पानटपरी, दुकानावर गुटख्याची विक्रीसोबत आता सिगारेट विक्री होते, अशी चर्चा सुरू आहे. सिगारेट ओढण्याचा कल युवकांसोबत शाळकरी मुलांमध्ये वाढताना दिसत आहे आणि ही बाब चिंताजनक आहे. पालकांनी याकडे वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रशासनावर किंवा पोलिसांवर अवलंबून राहून गुटखाबंदी होईल, सिगारेट बंदी होईल ही अपेक्षा न करता स्वतः पालकांनी व्यसनांपासून दूर होऊन मुलांना व्यसनापासून कसे दूर ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच पुढची पिढी ही व्यसनमुक्त होऊ शकेल. यात पालकांना स्थानिक नगरसेवक, सरपंच व गावपुढाऱ्यांनी साथ देणे गरजेचे आहे.

along with adults children are also turning to addiction of gutkha cigarette nandurbar news
Civil Hospital: पिण्याच्या पाण्याचे सदोष नमुने निघाल्यानंतर जिल्हा रूग्णालयातील जलकुंभाची साफसफाई!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com