अमळनेर- महसूल विभागाने २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे १३९.२६ टक्के महसूल कर वसूल केला आहे. गेल्या काही वर्षातील वसुलीचा हा उच्चांक आहे. वसुलीत अमळनेरचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आहे. ‘प्रपत्र-अ’मध्ये जमीन महसूल, बिन शेतीसारा व नजराणा आदी प्रकारच्या रकमेतून करवसुली होत असते, तर ‘प्रपत्र- ब’मध्ये गौणखनिज दंड, करवसुली आदी प्रकारची वसुली होत असते.