अमळनेर- येथील जळगावकडे जाणाऱ्या मार्गावरील कुऱ्हे गावाजवळ बनवलेला अंडरपास बोगदा व तेथील गतिरोधक नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. अनेक मोटारसायकलस्वार अपघाताने पडले आहेत. तरीदेखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने प्रशासन कोणाचा तरी जीव घेण्याचीच वाट पाहत आहे की काय, असा संतप्त सवाल या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.