अमळनेर- तालुक्यातील जळोद गावाकडून गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या पिकअप व्हॅनवर पोलिसांनी छापा टाकला. त्यात सुमारे ११ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा ५६ किलो ९७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (ता.२८) रात्री १०.५० ला येथून जवळच असलेल्या जळोद रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ करण्यात आली.