Yashwantrao Chavan Awards: यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‍मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा; जाणुन घ्या बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwantrao Chavan Awards

Yashwantrao Chavan Awards: यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‍मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा; जाणुन घ्या बदल

नंदुरबार : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्‍मयनिर्मितीसाठी प्रकाशन (Publication) वर्ष २०२२ करिता राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या (स्व.) यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‍मय पुरस्कार स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पाठविण्यास २ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Amendment to Rules of Yashwantrao Chavan State Literary Awards nandurbar news)

या स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून, या नियमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील, अशी सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी दिली.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्‍मयनिर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करिता राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या (स्व.) यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‍मय पुरस्कार स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पाठविता प्रवेशिक येणार होत्या.

मात्र या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली असून, आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याची अंतिम तारीख २ मार्च २०२३ अशी आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

२ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयान्वये गेल्या वर्षीच्या (स्व.) यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‍मय पुरस्कार स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून, या नियमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील, अशी सुधारणा करण्यात आली आहे.

या सुधारित नियमाची अंमलबजावणी २०२२ च्या (स्व.) यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‍मय पुरस्कार स्पर्धेपासून करण्यात येत आहे.

या योजनेची २०२२ च्या पुरस्कार स्पर्धेसाठीची सुधारित नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे,

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर व कार्यालयात उपलब्ध आहेत, असेही सचिव श्रीमती पाटील यांनी म्हटले आहे.