जळगाव- केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव, पाचोरा या रेल्वेस्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत भुसावळ रेल्वेस्थानकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, येथे वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स, डिजिटल डिस्प्ले प्रणाली आदी आधुनिक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.