Navratri Festival 2023: नवरात्रोत्सवकाळात डीजे-डॉल्बीवर बंदी; जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याकडून मनाई आदेश जारी

nandurbar district collector manisha khatri
nandurbar district collector manisha khatriesakal

Navratri Festival 2023 : १५ ते २४ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या काळात नंदुरबार जिल्ह्यात दुर्गादेवीची स्थापना व विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्या काळात डीजे-डॉल्बी वापरण्यावर बंदीचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.(appeal of Collector Manisha Khatri DJ Dolby banned during Navratri festival nandurbar news )

दरम्यान, सण/उत्सवादरम्यान शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या काही समाजकंटकांकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ प्रसारित केले जातात, तसेच सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर २४ तास विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

तसेच काही अनुचित प्रकार आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सूचित केले.

nandurbar district collector manisha khatri
Dhule News : तरुण उद्योजक जगताप यांचा डेंगीमुळे मृत्यू

''डीजे, डॉल्बीला बंदी घालण्यात आलेली आहे. नवरात्रोत्सवात वापर करू नये. समाजमाध्यमांमध्ये चुकीची माहिती/अफवा जाणीवपूर्वक प्रसारित करणे यास निर्बंध घालण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.'' -पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार

nandurbar district collector manisha khatri
Nandurbar News: बालसंगोपन योजनेचे वाढीव दराने अनुदान; जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्याची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com