नियुक्ती मुख्यालयात दादागिरी शहर पोलिसांच्या हद्दीत ; पोलिस ठाण्यात मारूनही निरीक्षक खुर्चीतुन उठे ना ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

पोलिस ठाण्याच्या आवारात झोंबाझोंबी होत असताना त्याचे चित्रण करण्यासाठी कॅमेरा काढणाऱ्या प्रतिनिधींवर हा पोलिस महाशय चाल करून गेला. या बाबत निरीक्षक अरुण निकम यांना सांगण्यास गेल्यावर त्यांनी तुम्ही पण तक्रार द्या, असे सांगत हात झटकले, परत यापोलिसांनी निरीक्षकांच्या केबिन मध्ये वाद घातला मात्र पोलिस ठाण्याच्या आवारात येऊन मुख्यालयाचा पोलिस मारझोड करतो या बाबत त्यांनी "ब्र' शब्द सुद्धा काढला नाही. 

जळगाव :- शहरातील शाहूनगर हनुमान मंदिरा जवळून एकवीस वर्षीय तरुणाला वर्दितील पोलिस कर्मचाऱ्याने सिनेस्टाईल रस्त्याने मारझोड करीत वरात काढल्याची घटना घडली. शाहुनगरातील याकूब बांगी आणि सलीम शेख अशा दोघांनी या तरुणाला त्या पोलिसाच्या तावडीतून सोडवले, इतक्‍यात शहर पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी आल्यावर या तरुणाला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मंदिरातील पुजाऱ्याने रात्री दिलेल्या तक्रारीवरून मुख्यालयात नियुक्त या कर्मचाऱ्यांच्या अंगात आज "सिंघम' आल्याची माहिती समोर आली. पोलिस ठाण्यात बाहेरचा कर्मचारी येऊन मारझोड करताना निरीक्षक अरुण निकम खुर्चीतुन उठेही नाही. दोघांना तक्रारीचा सल्ला देऊन त्यांनी कर्तव्य निभावले. 

तपस्वी हनुमान मंदिराचे पुजारी बालक सरजुदास (वय-28)यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे, शुक्रवार(ता.22) रोजी रात्री 9:30 वाजता गोलू वाडकर आणि दिलीप आसारे (दोघांचे पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांनी शिवीगाळ करून या मंदिरातून निघून जा, नाहीतर, तुम्हाला मारून-मारून हकलून लावू अशी धमकी दिल्या प्रकरणी (भादवी.504,506) प्रमाणे अदखलपात्र नोंद करण्यात आली आहे. दाखल तक्रारीत शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी सकाळी दखल घेतली नाही, म्हणून चक्क मुख्यालयात कार्यरत पोलिसाने गोलू नावाच्या तरुणाला हनुमान मंदिरा जवळून सिनेस्टाईल मारतच वरात काढली. हा पोलिस गणवेशात असल्याने त्याला अडसर आला नाही. मात्र, अमानुष मारहाण बघता शाहूनगर मशिदीचे याकूब बांगी आणि सलीम भाई अशा दोघांनी पोलिसाच्या तावडीतून या तरुणाला वाचवून शहर पोलिसांना फोन करून बोलावले. सुधीर साळवे सह एक कर्मचारी येऊन मारहाण झालेल्या तरुणाला बसवून पोलिस ठाण्यात घेऊन आले. 

पोलिस ठाण्यात दुसऱ्याला मारहाण 
घडल्या प्रकारासाठी माजी नगरसवेक विजय वाडकर, संतोष शेळके, मनोज राणे, सरदार तडवी, याकूब बांगी, सलीम शेख असे निरीक्षकांना भेटण्यासाठी आले असताना त्या पोलिसाने संतोष शेळके याच्या अंगावर जात कानशीलात लगावली. पोलिस ठाण्याच्या आवारात झोंबाझोंबी होत असताना त्याचे चित्रण करण्यासाठी कॅमेरा काढणाऱ्या प्रतिनिधींवर हा पोलिस महाशय चाल करून गेला. या बाबत निरीक्षक अरुण निकम यांना सांगण्यास गेल्यावर त्यांनी तुम्ही पण तक्रार द्या, असे सांगत हात झटकले, परत यापोलिसांनी निरीक्षकांच्या केबिन मध्ये वाद घातला मात्र पोलिस ठाण्याच्या आवारात येऊन मुख्यालयाचा पोलिस मारझोड करतो या बाबत त्यांनी "ब्र' शब्द सुद्धा काढला नाही. 

पोलिसांविरुद्ध गुन्हा 
त्या पोलिसाची तक्रार संतोष एकनाथ शेळके(वय-47) याने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे, तपस्वी हनुमान मंदिरा जवळून वावरु नये म्हणून बालक महाराज (तपस्वी हनुमान मंदिर) याने मुख्यालयातील पोलिस नटवर याला चिथावणी दिल्याने नटवर याने संतोष शेळके याला मारहाण केल्या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध (भादवी.223,504,506) प्रमाणे तक्रार नोंदवली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment headquarters within the boundaries of Dadagiri city police