Azadi ka Amrit Mahotsav 2022 : धुळेकरांचा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

marathon held in the city on Friday to mark the Amrit Jubilee year of Indian Independence. .
marathon held in the city on Friday to mark the Amrit Jubilee year of Indian Independence. .esakal

धुळे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे शहरात शुक्रवारी (ता. १२) झालेल्या दहा किलोमीटरच्या खुल्या मॅरेथॉनला धुळेकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी सहापासूनच स्पर्धक दाखल झाले. आमदार मंजुळा गावित आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी हिरवी झेंडी दाखविल्यावर मॅरेथॉनला सुरवात झाली. (Azadi ka Amrit Mahotsav 2022 Dhule citizens spontaneous response to marathon dhule Latest Marathi News)

शेकडो स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी पोलिस बँडवर देशभक्तिपर गीते वाजविण्यात आली. ठिकठिकाणी शालेय विद्यार्थी टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धकांचे स्वागत करत होते. विविध सेवाभावी संघटनांचे सामाजिक कार्यकर्तेही स्पर्धकांना लिंबू पाणी देत त्यांचा उत्साह वाढवीत होते.

पाचकंदील, आग्रा रोड, फुलवाला चौक, मोठा पूल, नेहरू चौक, दत्त मंदिर तेथून पुन्हा नेहरू चौक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा, वीर सावरकर पुतळा, जिल्हाधिकारी निवासस्थानमार्गे गरुड मैदानावर मॅरेथॉनचा समारोप झाला.

स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

उद्‌घाटनावेळी जिल्हाधिकारी शर्मा, आमदार सौ. गावित, राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक प्रल्हाद खाडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, उपजिल्हाधिकारी तथा अमृत महोत्सवी वर्ष समन्वय समितीचे समन्वयक उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॉ. महेश घुगरी, खो- खोपटू पंढरीनाथ बडगुजर, हेमंत भदाणे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या धुळे शाखेचे पदाधिकारी, माहेश्वरी मंडळ, जिल्हा क्रीडा महासंघासह विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

marathon held in the city on Friday to mark the Amrit Jubilee year of Indian Independence. .
Dhule : लळींग किल्ला पर्यटकांना खुणावतोय

आजही स्पर्धांचे नियोजन

आमदार गावित यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा होत आहेत. नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम सुरू आहेत. मॅरेथॉननंतर शनिवारी (ता. १३) सायकलिंग, चालणे आदी स्पर्धा होतील. या स्पर्धांनाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.

तसेच शनिवारपासून १५ ऑगस्ट पर्यंत घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक धुळेकर नागरिकांनी सहभागी होत देशाप्रती आदर व्यक्त करावा.

जिल्हा क्रीडाधिकारी जाधव यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे सुरू असलेल्या स्पर्धांची माहिती दिली. मॅरेथॉन कालावधीत पोलिस दलाने वाहतुकीचे नियोजन केले. त्यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता.

मॅरेथॉनमधील विजेते स्पर्धक

शहरातील दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने विजयी झालेले स्पर्धक असे : पुरुष गट- शरद भामरे (विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे), नीलेश माळी, सागर माळी

(बोरीस, ता. धुळे), महिला गट- निकिता थोरात (गुरू करिअर ॲकॅडमी, धुळे), कल्याणी चव्हाण (पिंपळादेवी विद्यालय, मोहाडी), पुनम माळी (एसएसव्हीपीएस कॉलेज, शिंदखेडा)

marathon held in the city on Friday to mark the Amrit Jubilee year of Indian Independence. .
Nandurbar : मंत्री डॉ. गावित यांचे नंदनगरीत स्वागत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com