दागिन्यांसह रोकड असलेली बॅग पोलिस ठाण्यात जमा

bag with cash and jewelry deposited at the police station
bag with cash and jewelry deposited at the police station

धुळेः ऑटो रिक्षात बसलेल्या एका महिला प्रवाशाची बॅग रिक्षातच अनवधानाने राहिली. काही वेळाने आपली बॅग रिक्षातच राहून गेल्याचं संबंधीत महिलेच्या निदर्शनास आले. दुसरीकडे काही अंतर गेल्यावर रिक्षाचालकाला महिलेची बॅग मागच्या सीटवर आढळून येते. संबंधीत रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवत महिलेची राहिलेली बॅग शहर पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधिन केली. या प्रामाणिक रिक्षाचालकाचा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार उपासे यांनी सत्कार करीत रिक्षाचालकाच्या हस्तेच संबंधित महिलेकडे बॅग स्वाधिन केली.
 
अशी घडली घटना

देवापूरमधील एकवीरानगरमध्ये राहणाऱ्या वंदना भाऊसाहेब देसले या नकाणे रोडहून गेल्या शनिवारी (ता.११) रिक्षाचालक मांगीलाल मनाजी सरक (रा. कॉटन मार्केट, रामचंद्रनगर, धुळे) यांच्या रिक्षात (एमएच१५/झेड१७९६) बसल्या. त्या शहरातील शहा फर्निचरजवळ उतरल्या. मात्र, उतरताना अनअवधानाने त्यांच्या हतातील बॅग रिक्षातच राहिली. या बॅगमध्य़े ३० हजार रुपयांसह चार ग्रॅमची सोन्याची माळ, आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे होती.

 काही वेळाने बॅग रिक्षातच राहिल्याचे देसले यांच्या लक्षात आले. त्यांनी रिक्षाची शोधाशोध केली मात्र ती कुठेही आढळली नाही. काही वेळाने रिक्षाचालकाला देसले यांची बॅग रिक्षातील मागच्या सीटलर आढळून आली. रिक्षाचालक सरक यांनी कुठलाही उशीर न करता प्रामाणिकपणे शहर पोलिस ठाणे गाठत देसले यांची बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. शहर पोलिसांनी बॅगेतील कागदपत्रे तपासून संबंधित महिलेशी संपर्क साधत त्यांच्या हरवलेल्या बॅगची माहिती दिली.

यानंतर श्रीमती देसले यांनी शहर पोलिस ठाणे गाठले तेथे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करीत त्यांचा सत्कार केला तसेच रिक्षाचालक सरक याच्या हस्तेच श्रीमती देसले यांना त्यांची बॅग स्वाधिन केली. श्रीमती देसले यांनाही रिक्षाचालक सरक यांचे आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com